पुणे – पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस यांच्या स्मरणार्थ प्रथमच आज पुण्याच्या रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबवर अश्वशर्यती घेण्यात आल्या. त्यात बी. जी. सफदार या घोड्याने ही स्पर्धा बाबूराव सणस मेमोरियल मिलेनियम चषक आणि रोख बक्षिस जिंकले. या स्पर्धेचे आयोजन बाबूराव सणस यांचे नातू सिद्धांत सणस यांनी केले होते.
या विजेत्या घोड्याचे मालक एम. एन. मिर्झा, रेहनुल्लाखान, एम. के. मोहन. सतीश कुंदापूर, आदील मसालावाला, सुनील आनंद आणि श्रीमती पूनम रूपानी हे आहेत तर रेहनुल्लाखान हे घोड्याचे प्रशिक्षक आहेत. विजेत्यांना बाबूराव सणस यांचे चिरजीव सुभाष व सुरेंद्र सणस आणि अनिता सणस यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी सर्व सणस कुटुंबिय आणि क्लबचे चेअरमन झेड. पूनावाला हे उपस्थित होते. त्यांनी सणस कुटुंबियांचे स्वागत केले आणि स्व. बाबूराव सणस म्हणजे रेसिंग मॅन होते असे सांगत त्यांनी बाबूराव आज तुम्ही जरी नसला तरी तुमचे कुटुंब रेसकोर्सवर आहेत असे सांगत त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.
या स्पर्धेबद्दल सिध्दांत सणस यांनी सांगितले की, माझे आजोबा बाबूराव सणस पुण्याचे पहिले महापौर होतेच पण हा बहुमान दोनवेळा मिळालेले ते एकमेव आहेत. त्यांनी जसे सामाजिक काम केले तसेच त्यांना प्राण्यांचेही प्रेम होते. त्यांचे २० स्वत:चे घोडे होते. त्यामुळे त्यांच्या आठवणीसाठी त्यांच्या नावाने एक अश्वस्पर्धा घ्यावी असे स्वन्प माझे वडील सुरेंद्र सणस आणि माझ्या काकांनी बघितले होते. ते पूर्ण करण्याची संधी आणि बहुमान मला मिळाला याबद्दल मला अभिमान आहे. बाबूराव सणस यांच्या नावाने पुण्याच्याच रेसकोर्सवर स्पर्धा होणे याला वेगळे महत्व असून ही स्पर्धा यापुढे दरवर्षी घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी रेसप्रेमी नागरीक आणि मुबई विवेक जैन, बिंदू चंपक झव्हेरी यांच्यासह पुण्यातील रेसचे शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

