मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन
पुणे- प्रसिद्ध व्यंगचित्रकार स्वर्गीय मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे नव्वदावे प्रदर्शन त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केले आहे. बालगंधर्व कलादालनात दिनांक ११आणि १२तसेच १३ नोव्हेंबर रोजी हे प्रदर्शन भरणार असुन पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते शनिवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हे उदघाटन करण्यात येणार आहे.या वेळी कोहिनूर ग्रूपचे श्री विनीत गोयल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी मंगेश तेंडुलकर यांच्या *तेंडुलकरी स्ट्रोक्स* या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. शनिवार,रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवशी सकाळी १० ते रात्रौ ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे