पुणे दि. 25 – राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमुळे पुणेकरांवर कराचे ओझे लादले गेले असून, या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणेकरांना दिलासा देऊ अशी ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
मुळीक म्हणाले, ‘‘महापालिकेकडून शासनाकडे 40 टक्के सवलतीचा ठराव रद्द करणे तसेच पूर्वलक्षी दराने कर वसूल करू नये यासाठी महापालिकेकडून अनेकदा ठराव पाठविण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने या ठरावा कडे दुर्लक्ष केले. 40 टक्के सवलत रद्द करणे आणि त्याची फरकाची रक्कम वसूल करणे हे अन्यायकारक आहे.’’
मुळीक पुढे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने करावरील 40 टक्के सवलत रद्द केली. महापालिकेने सवलत रद्द झालेली रक्कम तातडीने वसूल करण्याच्या घेतलेेल्या निर्णयाला स्थगिती देऊन पुणेकरांना दिलासा देण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पुणे शहर भाजपच्या वतीने भेट घेण्यात येणार आहे.’’