पुणे – पुण्याची तळजाई टेकडी म्हणजे पुण्याचे निसर्गसौंदर्य राखणारीजोपासणारी टेकडी आहे. या तळजाई चे हिवाळ्यात महाबळेश्वर होते हे महाबळेश्वर कायम राहावे यासाठी आमचा विशेष करून प्रयत्न आहे.असे येथील तळजाईचे शिल्पकार नगरसेवक सुभाष जगताप यांनी सांगितले
आज मराठी चित्रपट महामंडळ आणि महापालिका यांच्या वतीनेकलाकारांच्या हस्ते येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी तेबोलत होते .
खाजगी जागेवर आपण येथे वृक्षारोपण करीत आहोत याची त्यांनी यावेळी जाणीव करून दिली. टेकडीमाथा आणि उतार या विभागातील मोठी जागा येथे खाजगी मालकांची आहे. उच्च न्यायालयात याप्रकरणी पालिकेच्या विरोधात निकाल गेलेला आहे. येथील भूसंपादनासाठी अनंत तांत्रिक अडचणी असतानाही तळजाई चे अस्तित्व महाबळेश्वरसारखे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे त्यास या भागातील नागरिकांची साथ मिळाली. आता कलावंतांची हि मिळते आहे याबद्दल आपण भाग्यवान आहोत असे ते म्हणाले ,पहा आणखी आणि नेमके ते काय काय म्हणाले …

