पुणे : ‘ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन’तर्फे (एआयआरआयए) गरवारे बेस्ट्रेच लिमिटेडला नुकतेच रबर श्रेणीसाठी ‘टॉप एक्स्पोर्ट ॲवॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. कंपनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी अनिल कुलकर्णी यांना नियुक्त केले. श्री. कुलकर्णी यांनी नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका समारंभात केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. अनिल कुलकर्णी हे ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन रिसर्च’मध्ये अर्धवेळ ‘पीजी डिप्लोमा कोर्स इन मॅनेजमेंट – सत्र ४’चे विद्यार्थी आहेत.
अनिल कुलकर्णी हे ‘गरवारे बेस्ट्रेच लिमिटेड’च्या वाणिज्य विभागात वर्ष २००५ पासून कार्यरत आहेत. ‘सूर्यदत्ता’मध्ये शिकत असताना ते संस्थेने देऊ केलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा लाभ घेत आहेत. ‘गरवारे बेस्ट्रेच लिमिटेड’ ही इलॅस्टिक रबर टेप्स व वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमधील जागतिक कंपनी आहे.
अनिल कुलकर्णींकडे कंपनीत निर्यात-आयात प्रक्रिया, परकी व्यापार धोरण व सवलत योजनांशी संबंधित कामकाज सांभाळतात. त्यामुळेच त्यांना इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये (आयबीएम) विशेष प्रावीण्य मिळवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांनी त्यांचा उन्हाळी उमेद्वारी प्रकल्प गरवारे बेस्ट्रेचमध्ये ‘निर्यात प्रक्रिया व सवलत योजना’ या विषयावर पूर्ण केला आहे.
‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट’मध्ये मिळालेल्या शैक्षणिक ज्ञानाला अनिल कुलकर्णी यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमात लाभलेल्या मार्गदर्शनासाठी व प्रोत्साहनासाठी त्यांनी ‘सूर्यदत्ता ग्रुप’चे शिक्षण अधिष्ठाता डॉ. संजय चोरडिया आणि प्रा. शांतिलाल हजेरी यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत. डॉ. संजय चोरडिया यांनी श्री. कुलकर्णी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी सुयश चिंतले आहे.