पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने www.freshersjobfair.in च्या सहकार्याने येत्या शनिवारी (२४ जून) आपल्या बावधन कॅम्पसमध्ये (सर्व्हे नं. ३४२, पाटील नगर, बावधन, चांदणी चौक – पाषाण रोड) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत ‘जॉब फेअर’ या नोकरी मेळ्याचे आयोजन केले आहे. करिअर विकास पुढाकारांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व नोकरीचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने या उपक्रमाचे खास आयोजन केले आहे. सर्व आयटीआय/डिप्लोमा/पदवीपूर्व/पदवी
या मेळाव्यात ३० हून अधिक आघाडीच्या कंपन्या नोकरी देऊ करण्यासाठी सहभागी होणार असून त्यात इन्फोसिस, एचसीएल, एचडीएफसी बँक, युरेका फोर्ब्ज, कोटक महिंद्र बँक, एल अँड टी फायनान्स, सीड इन्फोटेक, एफआरआरफॉरेक्स, इक्विटास मायक्रो फायनान्स, अपोलो आदींचा समावेश आहे. मानवी साधनसंपत्ती (एचआर), वित्त, विक्री, माहिती तंत्रज्ञान विकास, यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य, बीपीओ केपीओ आयटीईएस आदी क्षेत्रांतील रोजगार संधींचा लाभ इच्छुकांना घेता येईल. (कंपन्यांचे नाव, पद, अनुभव, उमेद्वारी पात्रता याचा सविस्तर तपशील सोबत जोडला आहे.)
शून्य ते तीन वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या आणि कमाल २९ वयोमर्यादा असलेल्या इच्छुक उमेद्वारांना या मेळ्यासाठी आमंत्रित केले जात असून त्यांनी आपल्यासोबत किमान ८ ते १० रेझ्युमे आणावेत आणि मेळ्याच्या ठिकाणी सादर करावेत. नोकरी मिळाल्यास त्यांना पात्रता व अनुभव यानुसार महिन्याला १२ हजार रुपये ते १८ हजार रुपये आणि १८ हजार रुपये ते ३० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणे अपेक्षित आहे. आतापर्य़ंत २००० इच्छुकांनी या जॉब फेअरसाठी नावनोंदणी केली आहे. नावनोंदणीसाठी प्रत्येकी २०० रुपये शुल्क आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आपल्या करिअर विकास पुढाकाराचा भाग म्हणून अशी जॉब फेअर दरवर्षी आयोजित करते. गेल्या वर्षी तर त्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत फ्रेशर्स जॉब.इन व टाइम्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने २ जॉब फेअरचे आयोजन केले होते.
सूर्यदत्ता ही नोकरीची संधी सर्व इच्छुकांना, प्रत्येकाला आणि प्रत्येक वर्षी मिळवून देते. या मेळ्यात ४००० हून अधिक विद्यार्थी व काम करणारे व्यावसायिक भाग घेत आहेत. या नोकरी मेळ्यात कंपनीच्या धोरणानुसार सुयोग्य उमेद्वारांना जागीच नियुक्तीपत्रे मिळतात, तर पात्र उमेद्वारांची निवड यादी बनवली जाते.
सर्व विद्यार्थ्यांसाठी (बारावी उत्तीर्ण/पदवीपूर्व/पदव्युत्तर विद्यार्थी व काम करणारे व्यावसायिक) हा नोकरी मेळा घेण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे त्यांना एकाच छत्राखाली विविध नोकरी संधी मिळवून देणे, हा आहे.
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसआयएमएमसी) या संस्थेला सलग २ वर्षे (२०१५ – २०१६ व २०१६ -२०१७) प्लॅटिनम श्रेणीमध्ये मानांकन मिळाले आहे.
नोकरभर्ती करणाऱ्या सर्व संस्थांना अशा मेगा जॉब फेअर आयोजित करण्यासाठी सूर्यदत्ताचा बावधन कॅम्पस हे प्राधान्याने पसंतीचे ठिकाण ठरले आहे. अशा मेळ्यांसाठी आवश्यक असलेल्या ऑडिओ व्हिडिओ क्लासरुम्स, १००० प्रेक्षक क्षमतेचे सभागृह, शाकाहारी कॅफेटेरिया, भरपूर क्षमतेचा वाहनतळ, विशाल खुल्या लॉबीज व जागा, कंपन्यांच्या एचआर विभागांशी समन्वय साधण्यासाठी उत्साही कर्मचारीवर्ग व विद्यार्थी अशा सुविधा सूर्यदत्ता ग्रुपकडे उपलब्ध आहेत.
सर्व विद्यार्थी, काम करणारे व्यावसायिक अथवा नोकरीस इच्छुक उमेद्वार यांनी या जॉब फेअरसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन सूर्यदत्ताचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले आहे.


