पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत टिएटो, विप्रो, सिनेक्रॉन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पुना क्लब क्रिकेट मौदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत भूषण परंदकरच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर विप्रो संघाने एक्स्ट्रीम वेबटेकचा ६०धावांनी पराभव केला. मिहीर देसाई ३६, कृष्णा चक्रवर्ती ५३, भूषण परंदकर नाबाद ७४ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर विप्रो संघाने २०षटकात ६बाद १९१धावांचे आव्हान उभे केले. १९१धावांचे आव्हान एक्स्ट्रीम वेबटेक संघ पेलू शकला नाही. त्यांचा डाव २०षटकात ५बाद १३१धावावर संपुष्टात आला. यात प्रसाद पाटीलची नाबाद ७२धावांची खेळी अपुरी ठरली. विप्रोकडून मोहसीन शेख २०धावात ३ गडी बाद केले. सामनावीर भूषण परंदकर ठरला.
दुसऱ्या सामन्यात उमेश तोमर(४-२०)याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टिएटो संघाने सायबेजचा ४धावांनी विजय मिळवला. संजय सिंग नाबाद ८०धावांच्या खेळीच्या जोरावर सिनेक्रॉन संघाने आयप्लेसचा ८गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
टिएटो-१८.५षटकात सर्वबाद १००धावा(विक्रम माळी ३०, अंकित जैन २१, सौरभ रावळ २-११, गणेश मिसाळ ३-१०, निखिल गिरसे २-२५, राकेश शिंदे २-१८)वि.वि.सायबेज: १९.५षटकात सर्वबाद ९६धावा(प्रतीक पंडित ४२, संकेत कांबळे २४, अंकित जैन २-२०, उमेश तोमर ४-२०);सामनावीर-उमेश तोमर;
विप्रो: २०षटकात ६बाद १९१धावा(मिहीर देसाई ३६, कृष्णा चक्रवर्ती ५३, भूषण परंदकर नाबाद ७४, संजय रावत २-२८)वि.वि.एक्स्ट्रीम वेबटेक: २०षटकात ५बाद १३१धावा(प्रसाद पाटील नाबाद ७२, मोहसीन शेख ३-२०);सामनावीर-भूषण परंदकर;
आयप्लेस: १८.५षटकात ५बाद १३२ धावा(शशी झा २६, जोबीन जॉर्ज नाबाद २५, विवेक राठोड २-२२)पराभूत वि.सिनेक्रॉन: १३षटकात २बाद १३८धावा(संजय सिंग नाबाद ८०, मयूर सामंत नाबाद ३७, आकाश कनोजिया २-१७);सामनावीर-संजय सिंग.


