अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ व एमडब्लूटीए यांच्यात अंतिम लढत

Date:

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ, एमडब्लूटीए या संघांनी अनुक्रमे गोल्डन बॉईज व बालेवाडी टेनिस नट्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात पीवायसी अ संघाने गोल्डन बॉईज संघाचा 18-06 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्यात 80अधिक गटात पीवायसीच्या अमित नाटेकर व सारंग देवी यांनी गोल्डन बॉईजच्या डॉ.अमित पाटणकर व चिराग रुणवाल यांचा 6-0 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीवायसीच्या  योगेश पंतसचिव व अमित लाटे या जोडीने गोल्डन बॉईजच्या डॉ.केदार पाठक व आदित्य खटोड यांचा 6-2 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या खुल्या गटात पीवायसीच्या कौस्तुभ शहाने सारंग पाबळकरच्या साथीत कमलेश आठवले व जितेंद्र जोशी या जोडीचा 6-4 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. 

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एमडब्लूटीए संघाने बालेवाडी टेनिस नट्स संघाचा 18-11 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून निलेश ओसवाल, जयदीप वाकणकर, सुनील लुल्ला, प्रवीण पांचाळ,  विवेक खडगे, अभिषेक सिंग यांनी अफलातून कामगिरी बजावली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

पीवायसी अ वि.वि.गोल्डन बॉईज 18-06(80अधिक गट: अमित नाटेकर/सारंग देवी वि.वि.डॉ.अमित पाटणकर/चिराग रुणवाल 6-0; खुला गट: योगेश पंतसचिव/अमित लाटे वि.वि.डॉ.केदार पाठक/आदित्य खटोड 6-2; खुला गट: सारंग पाबळकर/कौस्तुभ शहा वि.वि.कमलेश आठवले/जितेंद्र जोशी 6-4);

एमडब्लूटीए वि.वि.बालेवाडी टेनिस नट्स 18-11(80अधिक गट: निलेश ओसवाल/जयदीप वाकणकर वि.वि.दिपक पाटील/जॉय बॅनर्जी 6-4; खुला गट: सुनील लुल्ला/प्रवीण पांचाळ वि.वि.आलोक नायर/नितीन सावंत 6-4; खुला गट: विवेक खडगे/अभिषेक सिंग वि.वि.अमित किंडो/चेन्ना कुमार 6-3).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...