Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

द बॉल हॉग्ज, क्यू क्लब वॉरियर्स, एलसीएसए, एमपी स्ट्रायकर्स, केएसबीए, खार जिमखाना संघाचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Date:

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बाद फेरीत द बॉल हॉग्ज, क्यू क्लब वॉरियर्स, एलसीएसए, एमपी स्ट्रायकर्स, केएसबीए, कॉर्नर पॉकेट शूटर्स, बीएसएए मास्टर्स, खार जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत शाहबाज खान, आशिक मुदसेर यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर क्यू क्लब वॉरियर्स संघाने फायर बॉल्सचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्लब अ संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात पहिल्या लढतीत द बॉल हॉग्जच्या लौकिक पठारेला पूना क्लबच्या विग्नेश संघवीने 14-49, 66-29, 17-40, 16-69 असा पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्जच्या आदित्य अगरवाल याने दिनेश मेहतानीचा 29-17, 73-52, 26-32, 66-(55)87, 33-15 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत द बॉल हॉग्जच्या रोहन साकळकरने पूना क्लबच्या सुरज राठीचा 35-22, 32-67, 33-24, 70-22 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत अक्षय कुमार, आयुश मित्तल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एलसीएसए संघाने ऑटो पॉट्स संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले. कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने क्यू मास्टर्स अ संघाचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. विजयी संघाकडून संकेत मुथा व तहा खान यांनी सुरेख कामगिरी बजावली. चुरशीच्या झालेल्या लढतीत खार जिमखाना संघाने एसआरके मास्टर्सचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात खार जिमखानाच्या ईशप्रित चड्डाला कडवी झुंज देत एसआरकेच्या वाहीद खानने  22-35, 61-42, 57-00, 03-59, 28-35 असा विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या लढतीत खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानीने एसआरकेच्या कृष्णराज अरकोटचा 46-16, 67-53, 50(42)-14 असा तीन फ्रेममध्ये सहज पराभव करून संघाचे आपल्या सामन्यातील आव्हान कायम राखले. तिसऱ्या लढतीत खार जिमखानाच्या रिषभ ठक्कर याने एसआरकेच्या मोहम्मद सलमानचा 35-14, 10-62, 38-14, 75-42) असा पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:
क्यू क्लब वॉरियर्स वि.वि.फायर बॉल्स 2-0(शाहबाज खान वि.वि.अमेय काळेकर 48-13, 80-35, 38-05; आशिक मुदसेर वि.वि.नितीन भोसले 44-16, 86(56)-22, 14-34, 63-17);

द बॉल हॉग्ज वि.वि.पूना क्लब अ 2-1( (लौकिक पठारे पराभूत वि.विग्नेश संघवी 14-49, 66-29, 17-40, 16-69; आदित्य अगरवाल वि.वि.दिनेश मेहतानी 29-17, 73-52, 26-32, 66-(55)87, 33-15; रोहन साकळकर वि.वि.सुरज राठी 35-22, 32-67, 33-24, 70-22);

एलसीएसए वि.वि.ऑटो पॉट्स 2-0(अक्षय कुमार वि.वि.लव बोरीचा 28-07, 54-09, 19-11; आयुश मित्तल वि.वि.सिद्देश मुळे 46-05, 64-69, 38-05, 62-55);

एमपी स्ट्रायकर्स वि.वि.कॉर्नर पॉकेट टायगर्स 2-0(केतन चावला वि.वि.माधव जोशी 44-06, 79(58)-16, 37-17; भरत सिसोडिया वि.वि.चिंतामणी जाधव 62(62)-00, 71-15, 39-07);

केएसबीए वि.वि.केव्हीडी स्कवाङ 2-0(दक्ष रेड्डी वि.वि.गौरव जयसिंघानी 40-28, 81(49)-42, 43-08; एमएस अरुण वि.वि.अभिनय एडके 01-34, 73-01, 07-39, 71-64, 39-01);

बीएसएए मास्टर्स वि.वि.पीवायसी जायंट्स 2-0(रोविन डिसुझा वि.वि.अरुण बर्वे 33-09, 72-26, 30-10; अभिमन्यू गांधी वि.वि.रोहित नारगोलकर 51-01, 63-08, 49-00);

कॉर्नर पॉकेट शूटर्स वि.वि.क्यू मास्टर्स अ 2-0(संकेत मुथा वि.वि.आकाश पाडाळीकर 66-00, 72-42, 37-17; तहा खान वि.वि.समीर बिडवई 37-35, 75-05, 43-12);

खार जिमखाना वि.वि.एसआरके मास्टर्स 2-1(ईशप्रित चड्डा पराभूत वि.वाहीद खान 22-35, 61-42, 57-00, 03-59, 28-35; स्पर्श फेरवानी वि.वि.कृष्णराज अरकोट 46-16, 67-53, 50(42)-14; रिषभ ठक्कर वि.वि.मोहम्मद सलमान 35-14, 10-62, 38-14, 75-42).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...

Pcmc आयुक्त हेही युती सरकारच्या प्रचार मोहिमेचे प्यादे ? आप चा थेट प्रहार

आजचे लाभार्थी कंत्राटदार हे भाजपचे देणगीदार आहेत की सरकारच...