- व्हेरॉकच्या सौरभ नवले याची धडाकेबाज शतकी खेळी
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना व पूना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमेय भावेच्या 97धावांसह साहिल छुरी(4-33)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 15धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 45षटकात 9बाद 212धावांचे आव्हान उभे केले. यात अमेय भावे 97(109), साहिल मदन नाबाद 16(20), अखिलेश गवळे पाटील 14(21), आर्या जाधव नाबाद 16(10), शुभंकर हार्डीकर 15, श्रेयश वालेकर 12यांनी संघाच्या डावाला आकार दिला. डेक्कनकडून प्रखर अगरवालने 39धावात 4गडी बाद केले. 212धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या डेक्कन जिमखाना संघाला 44.1षटकात 197धावावर आटोपला. डेक्कन संघ 3बाद 26 अशा अडचणीत असताना सुहेल श्रीखंडे(61धावा)व अभिषेक ताटे(43धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 108चेंडूत 100धावांची भागीदार करून संघाला 3बाद 126अशा सुस्थितीत आणले. पण 27व्या षटकात पीवायसीच्या साहिल छुरी याने अफलातून गोलंदाजी करत अभिषेक ताटे व दीपक गिरी हे 2महत्वपूर्ण गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर आदेश पालवेच्या नाबाद 47धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. यामध्ये पीवायसीच्या यश माने(2-52), आदित्य लोंढे(1-26), सिद्देश वीर(1-40), आर्य जाधव 1-46)यांनी अचूक गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी अमेय भावे ठरला.
दुसऱ्या सामन्यात सौरभ नवले(138धावा)याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने एमसीए 2 संघाचा 137धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. अन्य लढतीत राजवर्धन उंडरे(90धावा व 2-39)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पूना क्लब संघाचा 4गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 45षटकात 4बाद 247धावा(सौरभ नवले 138(120), यश जगदाळे नाबाद 33(29), किरण मोरे 25(49), ओम भोसले 24(59), रामेश्वर दौड 2-53, आदित्य कासुरखेडे 1-25, गौरव जोशी 1-36) वि.वि.एमसीए 2: 42.1षटकात सर्वबाद 110धावा(आनंद विश्वकर्मा नाबाद 59(115), वैभव पाटील 16, ओम भोसले 3-19, अॅलन रॉड्रिगेस 3-20);सामनावीर-सौरभ नवले;व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी137 धावांनी विजयी;
पीवायसी हिंदू जिमखाना: 45षटकात 9बाद 212धावा(अमेय भावे 97(109), साहिल मदन नाबाद 16(20), अखिलेश गवळे पाटील 14(21), आर्या जाधव नाबाद 16(10), शुभंकर हार्डीकर 15, श्रेयश वालेकर 12, प्रखर अगरवाल 4-39, आर्यन बांगळे 2-35, रेहान खान 1-23)वि.वि.डेक्कन जिमखाना: 44.1षटकात सर्वबाद 197धावा(सुहेल श्रीखंडे 61(81), अभिषेक ताटे 43(51), आदेश पालवे नाबाद 47(52), साहिल छुरी 4-33, यश माने 2-52, आदित्य लोंढे 1-26, सिद्देश वीर 1-40, आर्य जाधव 1-46);सामनावीर-अमेय भावे; पीवायसी 15धावांनी विजयी;
पूना क्लब: 45षटकात 9बाद 218धावा(चंद्रकांत सरोज नाबाद 42(41), संचित दास 40(61), अनिश पलेशा 38(40), ओंकार मोहोळ 32(54), ओंकार साळुंखे 19(17), मोनिश गोखले 3-26, कनय्या लड्डा 2-39, राजवर्धन उंडरे 2-39, मनोज हुमे 1-28)पराभूत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 42.3षटकात 6बाद 219धावा(राजवर्धन उंडरे 90(115), कनय्या लड्डा 37(49), ओंकार आढवडे 26(26), विराज धारवाटकर 15, शंतनु कदम 15, सौरभ यादव 2-35, ओंकार साळुंखे 1-21, ओंकार मोहोळ 1-33, दर्शित लुंकड 1-34);सामनावीर- राजवर्धन उंडरे; क्लब ऑफ महाराष्ट्र 4गडी राखून विजयी.