पुणे, 25 जून 2018: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आदिल खान याला पुढील दोन मौसमासाठी आपल्याकडेच कायम राखण्याची घोषणा केली. गत वर्षीच्या मौसमामध्ये आदिलने सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली. आदिलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संघाने अव्वल चौथे स्थान मिळवले.
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, आदिलचे पुनरागमन संघासाठी आत्यंत महत्वाचे आहे. संघाबाबतची त्याची बांधीलकी व समर्पन प्रशंसनीय आहे. आदिलच्या अष्टपैलुत्वामुळे टीमला भरपूर लवचिकता मिळाली ज्यामुळे टीमच्या ऐतिहासिक कामगिरीला मोठा हातभार लाभला आहे.
2017-18 च्या मौसमात आदिलने 18 सामन्यांमध्ये 4 गोल नोंदवले. यामध्ये जमशेदपुर एफसी संघाविरोधात खेळताना आदिलने सर्वोत्कृष्ट हेडर मारला. मिडफिल्डमध्ये तैनात करण्यात आलेल्या 29 वर्षीय आदिलने सर्वोत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले.
यावेळी आदिल म्हणाला की, पुन्हा एकदा एफसी पुणे सिटी संघात सामील होताना मला अतिशय आनंद होत आहे. एफसी पुणे सिटी संघाने माझे व्यावसायीक करियर परिपुर्ण केले आहे. एक संघ म्हणुन गेल्या मौसमात संघाने प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. या मौसमात करंडक जिंकण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. मी एफसी पुणे सिटी संघाकडून खेळण्यास उत्सुक आहे आणि ऑरेंज आरमीला साजरे करण्यासाठी अनेक चांगले क्षण आम्ही देऊ असे आदिल म्हणाला.

