दुहेरीत मुलांच्या गटात हर्ष फोगट व ऋषील खोसला यांना, तर मुलींच्या गटात श्रुती अहलावाट व मलिष्का कुरामु यांना विजेतेपद
मुंबई, 19 मे, 2018 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात दिल्लीच्या तेजस्वी दबस यांनी, तर मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या मानस धामणे या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत मुलांच्या गटात हर्ष फोगट व ऋषील खोसला यांना, तर मुलींच्या गटात श्रुती अहलावाट व मलिष्का कुरामु यांनी विजेतेप
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित मानस धामणे याने पश्चिम बंगालच्या दहाव्या मानांकित रोहन अगरवालचा 6-2, 6-4असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना सुमारे तास मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये मानसने पहिल्याच गेममध्ये रोहनची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये मानसने वर्चस्व कायम राखत पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा 6-2,असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 2-2 अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर मानस याने नेटजवळून आक्रमक खेळ करत रोहनची पाचव्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4असा जिंकून विजेतेपद मिळवले. दुहेरीत अंतिम फेरीत हर्ष फोगट व ऋषील खोसला या जोडीने मानस धामणे व प्रणव रेथीन यांचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 2-6, 10-4असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मानस धामणे हा एनसीएल येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो
मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात दिल्लीच्या सहाव्या मानांकित तेजस्वी दबसने तिसऱ्या मानांकित गुजरातच्या चांदणी श्रीनिवासनचा 6-0, 6-1 असा सनसनाटी पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. हा सामना सुमारे दोन तास चालला. दुहेरीत मुलींच्या गटात श्रुती अहलावाट व मलिष्का कुरामु यांनी निराली पदनिया व सौम्या रोंडे यांचा 6-0, 6-1असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जर्मनीचे राजदूत डॉ.युरजेन मोर्हाड आणि पेट्रा मोर्हाड, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ व्हाईट बॅच ऑफिशियल लीना नागेशकर आणि स्पर्धा संचालक मनोज वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: एकेरी गट:12वर्षाखालील मुली: तेजस्वी दबस(दिल्ली)(6)वि.वि.चांदणी श्रीनिवासन (गुजरात)(3) 6-0, 6-1;
12वर्षाखालील मुले:मानस धामणे (महा)(4)वि.वि.रोहन अगरवाल(पश्चिम बंगाल)(10) 6-2, 6-4;
दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले: हर्ष फोगट/ऋषील खोसला(1)वि.वि.मानस धामणे/प्रणव रेथीन 7-6(4), 2-6, 10-4
मुली: श्रुती अहलावाट/मलिष्का कुरामु