पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत देव हिंगोरणय, देवयानी कुलकर्णी, हवीश असराणी, प्रिथा वर्टीकर, दिपीत पाटील, समृद्धी कुलकर्णी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पराभव करून विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मिडजेट(10 वर्षाखालील) मुलींच्या गटात अंतिम फेरीत पुण्याच्या अव्वल मानांकित देवयानी कुलकर्णी हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत नागपूरच्या दुसऱ्या मानांकित जेनिफर व्हर्गीसचा 21/23, 13/15, 11/8, 11/6, 11/3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. ९वर्षीय देवयानी हि सेंट हेलेना शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या वर्षातील हे या गटांतील तिसरे विजेतेपद आहे. मुलांच्या गटात मुंबई उपनगरच्या दुसऱ्या मानांकित देव हिंगोरणय आपली विजयी मालिका कायम ठेवत नांदेडच्या नवव्या मानांकित कौस्तुभ गिरगांवकरचा 11/7, 14/12, 11/6 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. देव हा पोदार शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून खार जिमखाना येथे प्रशिक्षक गंदीप भिवनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या गटांतील दुसरे विजेतेपद आहे.
कॅडेट(12 वर्षाखालील) मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अव्वल मानांकित प्रिथा वर्टीकरने ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित आर्या सोंगडकारचा 11/7, 8/11, 11/6, 11/9 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. 11 वर्षीय प्रिथा हि पीईएस मॉडर्न हायस्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून रेडियंट स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटांतील हे दुसरे विजेतेपद आहे. याच मुलांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित हवीश असराणीने आपला शहर सहकारी तिसऱ्या मानांकित कुशल पटेलला11/9, 11/6, 11/5 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. हविश हा जसूदबेन एमएल शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून अंधेरी येथील वायएमसीएमध्ये प्रशिक्षक एरिक फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. हवीशचे हे तिसरे विजेतेपद आहे.
सबजुनियर (15 वर्षाखालील) मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत ठाण्याच्या व अव्वल मानांकित दिपीत पाटीलने दुसऱ्या मानांकित मुंबई उपनगरच्या मानव मेहताचा 6/11, 11/3, 14/12, 13/11, 9/11, 13/11 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दिपीत हा फादर ऍग्नेल शाळेत नववी इयत्तेत शिकत असून फादर ऍग्नेल अकादमीमध्ये प्रशिक्षक सुहास चव्हाण, चैतन्य उदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील हे तिसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात सोलापूरच्या सातव्या मानांकित समृद्धी कुलकर्णीने सुरेख खेळ करत मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित विधी शहा11/8, 11/9, 11/5, 11/4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. सम्रुद्धी हि शांती इंग्लिश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून पार्क क्लब येथे प्रशिक्षक आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटांतील हे पहिलेच विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व शिष्यवृत्ती आणि पारितोषिके मिळून एकूण पारितोषिक रक्कम 6,40,000/- अशी देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय नेमबाजपटू अंजली भागवत आणि मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामदेव शेलार, एमजीज फिटनेस अकादमीचे संचालक महेंद्र गोखले, बी.यू भंडारीचे संचालक देवेन भंडारी, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्षा स्मिता बोडस, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू डॉ.मंदिरा ठीगळे-बसक, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणी,पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव श्रीराम कोणकर, प्रसाद साळुंखे, एनडीटीटीएचे सचिव नरेंद्र छाजेड, स्पर्धा संचालक राजेश शेलार, सुचेता शेलार, एम्स फीनप्रोचे जतिन माळी, सिग्मा वन लॅडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक कपिल गांधी, व्हेरीयंट नेटवर्क प्रोडक्शनचे विक्रम गुर्जर, आदि मान्यवर उपस्थित होते.राहूल क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मिडजेट(10 वर्षाखालील)मुले– उपांत्य फेरी
कौस्तुभ गिरगांवकर(नांदेड,9)वि.वि.पियुष जाधव(नाशिक,4)10/12, 4/11, 11/9, 11/6, 11/8;
देव हिंगोरणय(मुंबई उपनगर,2)वि.वि.पार्थ देशपांडे(पुणे,6)11/9, 11/6, 11/9;
अंतिम फेरी:देव हिंगोरणय(मुंबई उपनगर,2)वि.वि.कौस्तुभ गिरगांवकर(नांदेड,9)11/7, 14/12, 11/6;
मिडजेट(10 वर्षाखालील)मुली: उपांत्य फेरी:
देवयानी कुलकर्णी(पुणे,1)वि.वि.उर्वी चुरी(मुंबई उपनगर, 4)11/8, 11/3, 11/9;
जेनिफर व्हर्गीस(नागपुर,2)वि.वि.ऊर्जा निळे(धुळे)11/4, 11/8, 11/1;
अंतिम फेरी: देवयानी कुलकर्णी(पुणे, 1)वि.वि.जेनिफर व्हर्गीस(नागपुर,2)21/23, 13/15, 11/8, 11/6, 11/3;
कॅडेट(12 वर्षाखालील) मुले- उपांत्य फेरी
हवीश असराणी(मुंबई उपनगर,1)वि.वि.गौरव पंचांगम(ठाणे)11/3, 11/8, 11/6;
कुशल पटेल(मुंबई उपनगर,3)वि.वि.कुशल चोपडा(नाशिक,)10/12, 11/4, 5/11, 11/7, 11/8;
अंतिम फेरी:हवीश असराणी(मुंबई उपनगर,1)वि.वि.कुशल पटेल(मुंबई उपनगर,3)11/9, 11/6, 11/5;
कॅडेट(12 वर्षाखालील) मुली: उपांत्य फेरी:
प्रिथा व्हर्टीकर(पुणे,1)वि.वि.तनिषा कोटेचा(नाशिक,5)12/10, 11/4, 11/3;
आर्या सोंगडकार(ठाणे,2)वि.वि.साची दळवी(ठाणे,11)13/11, 14/12, 12/10;
अंतिम फेरी: प्रिथा वर्टीकर(पुणे,1)वि.वि.आर्या सोंगडकार(ठाणे,2)11/7, 8/11, 11/6, 11/9;
सबजुनियर (15 वर्षाखालील) मुले- उपांत्य फेरी
दिपीत पाटील(ठाणे,1)वि.वि.करण कुकरेजा(पुणे, 5)11/7, 8/11, 11/7, 11/7, 11/4;
मानव मेहता(मुंबई उपनगर,2)वि.वि.आरुष गलापल्ली(पुणे,14)11/7, 11/8, 11/13, 12/10, 13/11;
अंतिम फेरी: दिपीत पाटील(ठाणे,1)वि.वि.मानव मेहता(मुंबई उपनगर,2)6/11, 11/3, 14/12, 13/11, 9/11, 13/11;
सबजुनियर (15 वर्षाखालील) मुली- उपांत्य फेरी
विधी शहा(मुंबई उपनगर,1)वि.वि.खेया शहा(ठाणे,5)11/8, 5/11, 12/10, 11/8, 6/11, 12/10;
समृद्धी कुलकर्णी(सोलापूर,7)वि.वि.तिया डिसुजा(मुंबई उपनगर,11)6/11, 3/11, 11/5, 13/11, 11/7, 11/5;
अंतिम फेरी: समृद्धी कुलकर्णी(सोलापूर,7)वि.वि.विधी शहा(मुंबई उपनगर,1)11/8, 11/9, 11/5, 11/4.
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: मुले: मानव मेहता; मुली: समृद्धी कुलकर्णी;
उदयोन्मुख खेळाडू: मुले: हविश असरानी; मुली: प्रिथा वर्टीकर;
शिष्यवृत्ती पुरस्कार विजेते: स्वस्तिक घोष, राधिका सपकाळ, नील मुळ्ये, ओम चोपडे, देवयानी कुलकर्णी, जश मोदी, कुशल चोपडा,
आर्या सोंगडकर, आरुष गलापल्ली, रिया कोठारी, कौस्तुभ गिरगांवकर, सायली वाणी.

