पुणे– आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत
पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत वैभव महाडिकच्या जलद 74 धावांच्या बळावर मर्क्स संघाने टेक महिंद्र संघाचा 31 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मर्क्स संघाने 20 षटकात 4 बाद 180 धावा केल्या. यात शुर्वा भंडारीने नाबाद 44 धावा करून वैभवला सुरेख साथ दिली.180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टेक महिंद्र संघ 20 षटकात 8 बाद 149 धावांत रोखला. मर्क्स संघाकडून दिनेश वाडकर, व्यंकटेश अय्यर व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. वैभव महाडिक सामनावीर ठरला.
दुस–या लढतीत रोहन खलाटेच्या जलद नाबाद 91 धावांच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने आय प्लेस संघाचा 77 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20 षटकाट 4 बाद 213 धावांचा डोंगर रचला. यात श्रिकांत कासारने 23 चेंडूत 41 धावा करून रोहनला सुरेख साथ दिली. 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आय प्लेस संघ केवळ 17.3 षटकात सर्वबाद 135 धावांत गारद झाला. यात आनंद कुमारने 69 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. रोहन खलाटे सामनावीर ठरला.
तिस–या लढतीत अंकित जैनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टिएटो संघाने टॅलेंटीको संघाचा 22 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना गणेश अंब्रेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टिएटो संघाने 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या. यात इमतीयाझ शेखने 40 करून गणेशला छान साथ दिली. 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वसिफ काझमीच्या 62 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अंकित जैनच्या अचूक गोलंदाजीपुढे टॅलेंटीको संघ 20 षटकात 8 बाद 162 धावा रेखला. 21 धावांत 4 गडी बाद करणारा अंकित जैन सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
मर्क्स– 20 षटकात 4 बाद 180 धावा(वैभव महाडिक 74 (48), शुर्वा भंडारी नाबाद 44,प्रतिक दुबे 2-25) वि.वि टेक महिंद्र– 20 षटकात 8 बाद 149 धावा(अंकित ठाकरे 22, विजय चाफळे 26, दिनेश वाडकर 2-7, व्यंकटेश अय्यर 2-20, तुषार देशपांडे 2-24) सामनावीर– वैभव महाडिक
मर्क्स संघाने 31 धावांनी सामना जिंकला.
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन– 20 षटकाट 4 बाद 213(रोहन खलाटे नाबाद 91(60), श्रिकांत कासार 41 (23), दिलीप मालवीय नाबाद 35, संजीव राणा 2-41) वि.वि आय प्लेस– 17.3 षटकात सर्वबाद 135 धावा(आनंद कुमार 69 (38), शशी झा 21, सिध्देश घालप 3-46, राजेंद्र जाधव 3-41) सामनावीर– रोहन खलाटे
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 77 धावांनी सामना जिंकला.
टिएटो– 20 षटकात 4 बाद 184 धावा(गणेश अंब्रे 50 (31),) इमतीयाझ शेख 40, विक्रम माळी 36, अंकित जैन नाबाद 28, सागर शेंडे 2-24) वि.वि टॅलेंटीको– 20 षटकात 8 बाद 162 धावा(वसिफ काझमी 62 (45), अंकुर विध्यार्थी 34, अंकित जैन 4-21) सामनावीर– अंकित जैन
टिएटो संघाने 22 धावांनी सामना जिंकला.

