पुणे-कर्तृत्वशालिनी, रणरागिनी, यशोदामिनी अशा स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महिला दिनाचा कार्यक्रम डे.ए.सो. च्या नवीन मराठी शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांची वेषभूषा केली होती.
सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक‘माला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ऑलिंपिक महिला हॉकी संघाच्या कर्णधार, अर्जुन पुरस्कार प्राप्त मा. सौ. रेखा भिडे व बालकिर्तनकार कु. ओवी काळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या.
शाळेतील विद्यार्थिनींनी संत मुक्ताबाई, जनाबाई, अहिल्यादेवी होळकर, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, पी. टी. उषा सिंधुताई सपकाळ, साईना नेहवाल, किरण बेदी, पी. व्ही. सिंधू, कल्पना चावला, सानिया मिर्झा, मिताली राज अशा सुप्रसिद्ध भारतीय कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा करुन स्वागत सादर केले.
प्रमुख पाहुण्या सौ. रेखा भिडे यांनी आपल्या भाषणात ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. खेळामुळे निर्णयक्षमता वाढते. ग्रासपिंग पॉवर वाढते. मेहनतीला पर्याय नाही, महिलांनी आत्मसंरक्षण करण्यास शिकायलाच पाहिजे असे सांगितले. शाळेतील मुलांनी प्रश्न विचारुन सौ. भिडे यांची मुलाखतही घेतली.
बालकिर्तनकार ओवी काळे हिने आपल्या किर्तनातून संत मुक्ताबाईंच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग व श्लोक यांची सांगड घालून छान किर्तन केले. शाळेतील विद्यार्थी किर्तनात छान रममाण झाले होते.
याच वेळी शाळेतील ‘मेक इन इंडिया’ या अभियानातील विजेत्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी बालगटातील मुलांच्या आवडत्या खेळाचे म्हणजेच भातुकलीचे प्रदर्शन पालक श्री. कोटा यांच्या सहकार्याने माडण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सौ. योगिता भावकर यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी मा. डॉ. श्री. सुनिल भंडगे, मा. डॉ. सविता केळकर, मा. डॉ. स्वाती जोगळेकर हे आवर्जुन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना देव यांनी केले. तर महिला दिनाची माहिती सौ. मीनल कचरे यांनी सांगितली.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. धनंजय तळपे, सौ. जयश्री खाडे व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. गौरी दाते व अनेक महिला पालक उपस्थित होत्या.
अशा प्रकारे अतिशय उत्साहाने नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
बाल किर्तनकार कु. ओवी काळे हिच्या किर्तनाने महिला दिन साजरा.’
Date:


