पुणे – संवेदनशीलता, स्वच्छ भारत, बालकामगार, महिला सक्षमीकरण, जलसाक्षरता, पर्यावरण, शांतता, एकात्मता, शहीदांप्रती कृतज्ञता, अंधश्रध्दा निर्मूलन अशा विविध सामाजिक भानांची संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय आणि मूकाभिनयाद्वारे जाणीव करून देत मनोरंजन करणारे स्नेह-संमेलन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
गणेश वंदना, शेतकरी नृत्य, मोवन नृत्य, गुजरातचा गरबा, पंजाबचा भांगडा, राजस्थानचा घुमर, बंगालचे चाऊ नृत्य आणि भरतनाट्यम अशा विविध प्रदेशांच्या लोकधारा चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या. गे‘सी डिसूझा यांना उत्कृष्ट शिक्षकांसाठीचा अलका आपटे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. श्रीकांत बोर्हाडे, प्रा. धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली शेवाळे, अंजली भडभडे, सिमरन गुजर, न्यानसी गवारे, शितल बेलोटी, हर्षदा कारेकर, नेत्रा वेदपाठक, अर्चना ननावरे, ज्योती जाधव, ज्योती क्षिरसागर या शिक्षकांनी संयोजन केले.

