सद्गुरु शंकर महाराज विशेषांकाचे प्रकाशन

Date:

पुणे – ‘गुरुतत्व’ मासिकातर्ङ्गे नोव्हेंबर २०१७ चा श्री सद्गुरू शंकरमहाराज यांच्या जीवनावरील विशेषांकाचे प्रकाशन आज समाधी मठात पार पडले.
‘गुरुतत्व’ मासिक हे मे २०१७ पासून प्रकाशित होत आहे. पहिल्या अंकापासून श्री दत्तात्रय, श्रीपाद श्रीव‘भ, नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती, श्री साईबाबा आणि या अंकात श्री शंकर महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.
दर महिन्याच्या अंकामध्ये एक अवतारी संताची माहिती व इतर मान्यवरांचे लेख असतात. गुरुतत्व हे एक मार्गदर्शक तत्व आहे. जे पृथ्वीच्या उत्पत्तीला होते आज स्थितीला आहे व पुढे पृथ्वीच्या लयापर्यंत राहणार आहे. मार्गदर्शक बदलत राहतात मात्र तत्व एकच असते याच तत्वाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘गुरुतत्व’ मासिकाची निर्मिती झाली आहे.
श्री शंकर महाराजांचा या अंकातून भक्तांना त्यांच्या जन्मापासून त्यांनी घेतलेल्या संजीवन समाधीपर्यंतच्या कार्याची माहिती मिळू शकेल. जी भाविकांना उपयोगी पडेल अशी आशा आहे.
सदर प्रकाशन समारंभ शंकर महाराज समाधी मठाचे अध्यक्ष प्रभाकर मोगल, विश्‍वस्त सुरेंद्र वाईकर, व्यवस्थापक विलास पानसरे, सरव्यवस्थापक सुर्यकांत केळकर, निनाद पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सणस, संचालक किरण वाईकर, रामलिंग शिवनगे आणि प्रकाशक संतोष जोशी, मुद्रक सुरेंद्र पैठणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक‘माचे सूत्रसंचालन निनाद पतसंस्थेचे अध्यक्ष उदय जोशी यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...