Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे(संपूर्ण भाषण – व्हिडीओ)

Date:

पंढरपूर: ‘युतीच्या फालतू चर्चेत मला पडायचे नाही. युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, आम्ही ठरवलंच आहे. आता शेतकरी-कष्टकऱ्यांचं तुफान उठलंय. त्याला शांत करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ. मला सत्ता नकोय. जागा वाटपात मला स्वारस्य नाही. राम मंदिर झालंच पाहिजे, तुमचं जागा वाटप गेलं खड्ड्यात,’ असा घणाघात करतानाच पिक विम्याचं कंत्राट खासगी कंपनीला दिलं. राफेलमध्ये घोटाळा झालाय. किती पापं करणार? कडुलिंबालाही किड लागलीय. हे पहिल्यांदाच असं घडतंय. करणार काय? हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

हिंमत असेल तर शिक्षा करून दाखवा
‘शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणं गुन्हा असेल तर तो गुन्हा करणारच. न्याय मागणं आणि सरकारला धारेवर धरणं गुन्हा असेल तर हा गुन्हा करणारचं. हिंमत असेल तर मला शिक्षा करून दाखवा,’ असं आव्हान देतानाच तुमची मस्ती इथे नाही चालणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र तुमची मस्ती खपवून घेणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांच्या ठिकऱ्या उडाल्या
उद्धव यांनी सभेच्या सुरुवातीलाच पाच राज्यातील निकालावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. मिझोराम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, असं सांगतानाच आम्ही जगज्जेते आहोत असा समज असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पाच राज्यातील निकालांनी ठिकऱ्या उडवल्या, अशी टीकाही त्यांनी केली.

देवाच्या नावानं जुमला कराल तर ठोकून काढू
तुम्ही अच्छे दिनचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही. त्याबद्दल तुम्हाला एकवेळ माफ करू. इतर मुद्द्यावरही तुम्हाला माफ करू, पण आमच्या देवाच्या नावानं जर जुमला केला तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पासवान, नितीशकुमारांनी राम मंदिरावर भूमिका मांडावी
जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवायला निघाले होते, त्यांच्यासमोर भाजपनं गुडघे टेकलेत. भाजप आज या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे, असं सांगतानाच राम मंदिराबाबत नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं. मोदींनी राम मंदिराबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. माझं तुम्हाला आव्हान आहे. मग कळेल एनडीएतील कोणते घटक पक्ष तुमच्या बाजूने उभे राहतात, असा चिमटाही त्यांनी काढला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे…?
>> या मैदानावर सभा घेण्याची कोणी हिम्मत करत नाही. म्हणून येथे सभा घेतली. कारण बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र दुसऱ्या मैदानावर सभा घेऊच शकत नाही.
>> शेतकऱ्यांसह सध्या अनेक समस्या आहे.कशावर बोलावे, कशावर नाही असा प्रश्न आहे.
>> जगज्जेते असल्याचा समज एका पक्षाने पसरवला होता. पंचायत समिती असो की, लोकसभा आम्हीच जिंकणार असेच सांगितले जात होते.
>> जगज्जेते असलेला जो समज पसरवला होता त्याच्या ठिकऱ्या पाच राज्यांनी उडवून टाकल्या.
>> पाच राज्यांपैकी मिझोरम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली
>> छत्तीसगडमध्ये बहुसंख्य आदिवासी आहेत. त्याठिकाणी पर्याय नसल्याने छत्तीसगडने आधी घर स्वच्छ करायचे म्हणून विरोधात मतदान केले.
>> महाराष्ट्रानेही हेच धाडस दाखवावे.
>> राममंदिर बांधणारच पण झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो.
>> आज पंढरपुरातही त्याचसाठी आलो आहे. तू झोपला असला तरी हिंदू जागा आहे, हे मला कुंभकर्णाला सांगायचे आहे.
>> कुंभकर्णा वेळेवर जागा हो नाही तर पेटलेला हिंदू तुला जागा करेल
>> सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार
>> हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागले आहेत
>> ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं वाकडं केलं, त्यांचं वाकडं कर असं विठुरायाला साकडं घातलं
>> मोदींनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे, पण नंतर तेच म्हणतील हा निवडणुकीचा एक जुमला होता.
>> देशात शस्त्र खरेदी करण्यात घोटाळा होतो. सैनिकांच्या पगारवाढीचा प्रस्ताव फेटाळला जातो.
>> सरकारी कंपनी असताना खासगी कंपनीला कंत्राट का दिले जाते.
>> युती करायची की नाही ते जनताच ठरवेल
>> राम मंदिराचा मुद्दा मुद्दाम घेतला आहे. 20 वर्षांपासून फक्त निवजडणुका आल्या की आश्वासन दिले जाते.
>> सोहराबुद्दीनच्या हत्येच्या कटातील आरोपी निर्दोष सुटले, पण राममंदिर संबंधित खटले आजही सुरू आहेत.

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणी करता जनजागृतीसाठी उद्धव ठाकरे सोमवारी महासभा घेऊन चंद्रभागा नदीची महाआरजी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

29 महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ...

25 वर्षे मुंबई लुटली म्हणता, तेव्हा तुम्ही कुठे होता?:महापौर आमचा असताना उपमहापौर तुमचा होता

छत्रपती संभाजीनगर-राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा...

मंत्री माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांची शिक्षा कायम:सदनिका प्रकरणात सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई-- फडणवीस सरकारमधील मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची दोन...

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...