मुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. शेतकर्यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संप यशस्वी करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांची भूमिका आहे. स्वामिनाथन आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50 टक्के देण्याबाबतही शेतकऱ्यांनी आग्रही राहावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.शेतकर्यांच्या भावना तीव्र आहेत. पण शेतमालाची नासाडी न करता गावातील गरीब घटकांना त्याचं वाटप करावं आणि सामान्य लोकांशी आपली नाळ भक्कम करावीसंपकरी शेतकऱ्यांकडून भाजीपाला, दूध यांसारख्या वस्तू रस्त्यावर फेकून आंदोलन केलं जात आहे. मात्र या वस्तू गरिबांना देऊन त्यांची गरज भागवावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.