पुणे- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. या आमदारांनी माझी भेट घेतल्यानंतर ज्या बातम्या आल्या, त्याचे मला आश्चर्य वाटले, असेही पवार यांनी सांगितले.
उदयनराजे यांच्या उमेदवारीचा विषय गेले तीन दिवस गाजतो आहे. साताऱ्यातील आमदारांनी काल पवार यांची बारामती येथे भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे यांनीही पवार यांची आज पुन्हा पुण्यात भेट घेतली. त्यावर विविध तर्क मांडण्यात आले.
याबाबत पुण्यात बोलताना पवार म्हणाले की उदयनराजे यांच्या उमेदवारीला एकाही आमदाराने विरोध केलेला नाही. सर्वजण मिळून पुढील आठ दिवसांत यावर निर्णय घेऊ. त्यासाठी सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासह लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या खेळीमेळीच्या वातावरणात या बैठका घेऊ आणि निर्णय करू असेही त्यांनी नमूद केले.

