बांधकाम नियमावलीची सामान्य जनतेला माहिती होणे गरजेचे – आ मेधा कुलकर्णी
पुणे-प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे संस्थापक संजय रामचंद्र तथा एस आर कुलकर्णी यांनी नवीन बांधकाम नियमावलीचे सारांश रूपांतर केले असून ही पुस्तिका प्रभाग १३ मधील व कालांतराने कोथरूड मधील सर्व सोसायट्यांच्या अध्यक्ष व चेयरमन यांना मोफत वितरित करण्याचा संकल्प नगरसेविका सौ मंजुश्री खर्डेकर यांनी केला असून या मोहिमेचा प्रारंभ आज पहिले पुस्तक आमदार मेधा कुलकर्णी यांना भेट देऊन करण्यात आले.यावेळी पुस्तकाच लेखक एस आर कुलकर्णी ,नगरसेवक राजाभाऊ बराटे,सुशील मेंगडे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,व्यापारी आघाडीचे दत्ताजी देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.हे पुस्तक ग्राहक पेठेच्या सूर्यकांत पाठक यांनी ग्राहकहित प्रकाशन तर्फे प्रकाशित केले असून पुस्तक वितरणात त्यांचा मोलाचा वाट असल्याचे संदीप खर्डेकर यांनी नमूद केले.सामान्य नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या नवीन बांधकाम नियमावलीची माहिती होणे गरजेचे असून ही पुस्तिका मोफत वाटप करण्याचा मंजुश्री खर्डेकर यांचा उपक्रम स्तुत्य असल्याचे आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
प्रभागात फिरताना जाणवले की अनेक लोकांना महापालिकेच्या बांधकाम नियमांची माहिती नसते,अनेक वेळा बाल्कनीचे काय करायचे,टी डी आर किती मिळणार,एफ एस आय किती यासह अनेक प्रश्न लोकांना पडतात असे जाणवले त्यामुळे हे पुस्तक वितरित करण्याची मोहीम राबवित असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.