“क्रिएटिव्ह “च्या पाठपुराव्यास यश – चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र + मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा = या कागदपत्रांची आवश्यकता नाही
“क्रिएटिव्ह “च्या पाठपुराव्यास यश – चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र + मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा = या कागदपत्रांची आवश्यकता नाही – निवडणूक कार्यालय रविवार दि २९ जानेवारीस ही खुले राहणार, तसेच वैयक्तिक शौचालय असल्याबाबत चे मनपा चे प्रमाणपत्राबाबत आयोगाच्या सूचनेची प्रतीक्षा = मा सतीश कुलकर्णी यांची स्पष्टोक्ती’
निवडणुकीसाठी चा अर्ज भरताना कोणती कागदपत्रे द्यायची याबाबतची संदिग्धता आज श्री सतीश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधल्यानंतर संपली असून सर्व इच्छूक उमेदवारांनी विनाकारण धावपळ करू नये असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले आहे.
मी स्वतः डमी फॉर्म भरला असून त्यात किचकट असे काहीच नाही.विशेषतः पोलीस आयुक्तालयातून ” चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची ” आवश्यकता नसून आपल्यावर असलेल्या केसेस बाबत अथवा एखाद्या गुन्ह्यात झालेल्या शिक्षेबाबत स्वतः उमेदवारानेच प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे (ते ही ऑनलाईन ) असे ही त्यांनी स्पष्ट केले.तसेच याबाबत निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी ( मो-9921392233) यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी ही यास दुजोरा दिला असल्याचे ही ते म्हणाले.तसेच उमेदवाराने अर्ज भरताना मतदार यादीतील आपले व सूचक अनुमोदकाचे नाव व मतदार क्रमांक टाकल्यावर त्याच्या कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसल्याचे ही श्री कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे,
तसेच क्रिएटिव्ह फाउंडेशन ने केलेल्या मागणीनुसार रविवार दि २९ जानेवारी रोजी ही निवडणूक कार्यालय खुले राहील असे परिपत्रक आयोगाने काढले आहे.
त्याचप्रमाणे अर्ज भरताना त्यात “यापूर्वी निवडणूक लढवली असल्यास त्याचा तपशील व त्या वेळी सादर केलेले उत्पन्नाचे तपशील भरावयाचे आहे ” मात्र हे ज्यांनी मनपा अथवा तत्सम निवडणूक लढविली त्यांच्यासाठी असून ” शिक्षण मंडळ,वृक्ष संवर्धन,पी एम टी,अश्या निवडणूक लढविणाऱ्यांसाठी हे लागूं नाही असे ही श्री सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
तसेच शहरी भागात फ्लॅट मध्ये राहणार उमेदवार हा स्वाभाविकच उघड्यावर शौचास बसत नाही,त्यामुळे त्यास मनपास अर्ज करणे,त्याच्या घरी सॅनेटरी इन्स्पेक्टर ने येणे व घरातील शौचालय बघून तसे प्रमाणपत्र देणे हे वेळखाऊ,अनावश्यक आणि हास्यास्पद आहे असे निवेदन क्रिएटीव्ह फाउंडेशनच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी सादर केले होते,यावर निवडणूक आयोगाच्या सूचना अपेक्षित असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
तरी इच्छूकांनी गांगरून जाऊ नये व काही अडचण अथवा प्रश्न असल्यास क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या 9850999995 या क्रमांकावर संपर्क साधावा असे ही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे.
आज २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला,या दिवशी मतदान केंद्र असलेल्या शाळांमध्ये मतदारांना समारंभपूर्वक ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम तसेच सकाळी ११ वाजता शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचे पत्र सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्याने माझे मतदान केंद्र असलेल्या अभिनव शाळा एरंडवणा यास दिले होते.मी आज या शाळेत ओळखपत्र घेण्यासाठी गेलो असता येथे कोणीच आले नसल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले.शाळेला दिलेले पत्र कडक स्वरूपाचे असून ” या कामी कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा,टाळाटाळ,बेजबाबदारपणा केल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० कलम ३२ (२) अन्वये फौजदारी कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे,मात्र या शाळेत या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी फिरकलेच नाहीत,त्यामुळे आता कोणावर फौजदारी करायची हे आयोगाने स्पष्ट करावे व असे कार्यक्रम कोणकोणत्या मतदान केंद्रांवर झाले आणि कोठे झाले नाहीत याचा तपशील जाहीर करावा अशी मागणी क्रि एटीव्ह फाउंडेशन च्या वतीने करीत आहे .