वैकुंठ विद्युतदाहिनीतील सोलर यंत्रणा कुचकामी…कर्मचाऱ्यांचे ही हाल…
पुणे- वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहीनिसाठी असलेली सौर उर्जा यंत्रणा नादुरुस्त असून हि यंत्रणा सांभाळणार्या कामगारांची संख्या कमी असल्याने उपलब्ध कामगारांचे हाल होत असल्याची तक्रार क्रिएटिव्ह फौन्डेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे .
या संदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातम्हटले आहे कि , वैकुंठ विद्युतदाहिनी येथे तीन पाळया मधे तीन असिस्टंट इलेक्ट्रिक ऑपरेटर कामास असून त्यांना एक ही रिलीव्हर उपलब्ध नाही.विद्ययुतदाहिनीत रात्रंदिवस काम चालते व येथील कर्मचाऱ्यांना सतत विपरीत वातावरणात तणावात काम करावे लागते.अश्या परिस्थितीत सहा महिन्यात या ऑपरेटर्स ना साप्ताहिक सुट्टी सुद्धा घेता आलेली नाही.एखाद्या कर्मचाऱ्यांस सुट्टी घ्यायची झाली तर अन्य कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागते.अनेक वेळा हे कर्मचारी सलग तीन तीन पाळयात ही काम करत आहेत.हे अमानवी असून मी स्वतः गत सहा महिने अधीक्षक अभियंता श्री चौधरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे मात्र ते गोड बोलने व आश्वासन देणे यापलीकडे काहीच करत नाहीत. तरी आपण याबाबत त्वरित कार्यवाही चे आदेश द्यावेत ही आग्रही मागणी करत आहे.
तसेच विद्युतदाहिनीतील अंत्यविधी व अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकाना गरम पाणी मिळावे यासाठी सोलर यंत्रणा बसविली असून तेथील टाकीस पाणीपुरवठाच होत नसल्याने गरम पाणी उपलब्ध होत नाही.तसेच येथे असलेली सोलर यंत्रणा सदोष असल्याने तेथील लाईट देखील अर्धवट स्थितीत सुरु आहेत व अनेक दिवे हे थेट विद्युत कनेक्शन शी जोडावे लागले आहेत. एका चांगल्या व वीज वापर वाचविणारया यंत्रणेचा अधिकारयांच्या अनास्थेमुळे उपयोग होत नाही हे दुर्दैवी आहे .(अधिकार्यांशी संपर्क साधला असता तेथे झाडान्मुळे पुरेशा सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही व पक्ष्यान्मुळे ही सोलर यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचे ते सांगतात .) तरी याबाबत ही योग्य कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी करत आहे.