मराठी चित्रपट सृष्टीला ग्लॅमर देणारी तसेच वेगवेगळ्या दर्जाच्या आव्हानात्मक भूमिका स्वीकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात ती वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासोबत नुकतेच मराठी चित्रपटांना इफि सारख्या प्रतिष्टित फिल्म फेस्टिवल मध्ये दर्शवण्याचा मान सईला मिळाला.
२०१७ मध्ये ही तिने छोट्या छोट्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे वेगळेपण लोकांपर्यंत पोहचवले. जाऊंद्या बाळासाहेब मधली करिष्माची भूमिका असो, किंवा फॅमिली कट्टा मधली मंजू असो. सई ह्या भूमिकांसाठी लोकांच्या लक्षात राहिली. २०१७ च्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ ह्या पुरस्कार सोहळ्यात सईला तीन नामांकन जाहीर झाली आहेत. फेवरेट अभिनेत्री (जाऊंद्याना बाळासाहेब) तर सहायक अभिनेत्री (फॅमिली कट्टा) इतकंच न्हवे तर ‘फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इअर’ साठी देखील सईला नामांकन मिळाले आहे. तीन नामांकने मिळ्याल्याबद्दल सईला विशेष आनंद आहे. ह्या नामांकांतून हे सिद्ध होते, कि भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते तर भूमिकेला योग्य न्याय देणे महत्त्वाचे असते. ही ३ नामांकने त्याचीच पोचपावती आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.