‘
पुणे, : श्वेता असोसिएशन हा पांढरे डाग (कोड) असणाऱ्या व्यक्तींचा स्वमदत गटाने दरवर्षी प्रमाने यंदाही जनजाग्रुतीसाठी मिनी मँराथॉन आयोजन केले होते. रविवार, दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी बी जे मेडिकल कॉलेज ग्राउंड येथून सकाळी ६ वाजता रनची सुरुवात झाली होती. या उपक्रमात बी जे मेडिकल यांचा प्रमुख सहभाग आहे.
स्पर्धेचे फ्लॅग ऑफ १० किमी – पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती, ५ किमी – आ. मेधा कुलकर्णी, कमांडर जितेंद्र नायर, ३ किमी – श्वेता असोसिएशनच्या डॉ. माया तुळपुळे, फ्री रनर्स ग्रुपच्या संगीता ललवाणी या मान्यवरांनी केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण बी.जे. मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. मोहन जोशी, फ्लिपगार्ड फिल्टर्स प्रा. लि.चे अध्यक्ष संजय कुलकर्णी,प्राजक्ता कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. डॉ. जयंत नवरंगे, संदिप देवकर, मुक्ता तुळपुळे, शंकरराव तत्ववादी, डॉ. आरती निमकर व सहकारी यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचं निवेदन हेमा पांडे, आशिष महाजन यांनी केले.
कोड विषयक अनेक गैरसमज दूर करण्यासाठी संस्था गेली १६ वर्षे काम करीत आहे. या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याकरिता अनेक उपक्रम राबविले जातात. ‘कोड’ या सामाजिक कलंक असलेल्या एका दुर्लक्षित विषयासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि वैद्यकीय संस्था यानिमित्ताने एकत्र आल्या होत्या.
‘रन फॉर व्हिटीलिगो’ : विजेते स्पर्धक | |
10 KM पुरुष | |
प्रथम क्रमांक | करमवीस सिंग |
1st Runner Up | बी. सिंग |
2nd Runner Up | विकास कुमार |
10 KM महिला | |
प्रथम क्रमांक | हिमांगी गोडबोले |
1st Runner Up | मोनाझ गोवेकर |
2nd Runner Up | आकृती प्रसाद |