Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन

Date:

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय ४८) यांचे आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कांबळे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. त्याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेचच उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मुंढवातील भिमनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून आज सांयकाळी ५ वाजता निघणार आहे. कोरेगाव पार्क येथील स्मशानभुमीत अंत्यविधी होणार आहे.

मुळचे रिपाइंचे असलेले कांबळे हे नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून विजयी झाले होते. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्षाने त्यांना उपमहापौर पदाची संधी दिली होती. ते रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव हे त्यांच मुळ गाव आहे. १९७२ च्या दुष्काळात पुणे येथील विश्रांतवाडी येथे ते स्थायिक झाले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती. १९७७ पासून दलित पँथरमधून सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८० मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. या आंदोलनात त्यांना कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पँथरचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात रिपाइंचे शहराध्यक्ष बनले होते. १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. १५ मार्च रोजी २०१७ रोजी त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली होती.

दरम्यान, नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे महापालिकेची सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...