जागतिक नृत्य दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ए. एस. एन्टरमेन्ट व सनीज डान्स अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमानाने खुली नृत्य स्पर्धामध्ये रिदम डान्स ग्रुपने विजयी चषक जिंकला . या स्पर्धेचे संयोजन सनीज डान्स अकॅडेमीचे संचालक सनी गाडे व ए. एस. एन्टरमेन्टचे संचालक अतिश साळवे यांनी केले होते .
ढोले पाटील रोडवरील ढोलेपाटील शाळेच्या मैदानावर या नृत्य स्पर्धा पार पडल्या . . या स्पर्धेमध्ये ३० संघ सहभागी झाले होते .
या नृत्य स्पर्धंमध्ये जजेस काम वारपाथ या चित्रपटामधील अभिनेत्री लाडा लकी यांनी पहिले . या स्पर्धेमध्ये प्रमख आकर्षण म्हणून प्रसिध्द सिनेअभिनेता मुकेश गायकवाड , बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टर सनी आगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते . या नृत्य स्पर्धेमधील विजेत्यांना प्रमुख पाहुणे नगरसेविका लता राजगुरू यांच्याहस्ते अवॉर्ड , सर्टिफिकेट आणि रोख पारितोषिके देण्यात आली . तसेच त्यांना म्युजिक आल्बम व फेस्टिव्हल फिल्ममध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहेत .
या नृत्य स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका लताताई राजगुरू , नगरसेविका लताताई धायरकर , पोलीस अधिकारी मदन बहाद्दूर पुरे , स्वीकृत नगरसेवक सुजित यादव , जनमत वृत्तवाहिनीचे संचालक प्रमोद गरड आदी मान्यवर उपस्थित होते .

