Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फ्रेम फोटोग्राफर च्या संघर्षाची …

Date:

        एका कार्यक्रमाचे फोटो शूट करून मी माझ्या ऑफीस वर आलो, कॉम्प्युटर

        वर फोटो लोड करायला लावले आणि अचानक लाईट ( दिवे ) गेली. माझं लक्ष 
        भिंती वरील माझ्या प. पु. गुरुदेवांच्या फोटो कडे गेले, मी फोटो कडे
         लक्षपूर्वक पाहत होतो आणि माझे मन भूतकाळात गेले. मी कोण होतो,
        कसा घडलो आणि आज काय आहे, असा जीवनपटच डोळ्या समोर उलगडू
        लागला.     

         लहानपणी घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, वडील पिंपरी येथील

         हिंदुस्तान अँटिबायोटिक्स मध्ये कामाला, प्रसंगी रस्त्यावर बसून मफलर  
         विकण्याचेही काम त्यांनी केले. हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल च्या
शिक्षकांमुळे इयत्ता सहावीला असताना शिक्षकांनी संस्कार  दिले ते
स्वावलंबनाचे. त्यांनी सांगितले होते कोणावरही अवलंबून न राहता आपण

         आपल्या  पायावर उभे राहावे. मी सातवीला असतानाच मनाचा निश्चय केला
         कि आपला खर्च आपणच कमवायचा.
         माझे मित्र सचिन शहा यांचा त्याकाळातील ६०, ९० च्या ऑडिओ कॅसेट मध्ये
         गाणी रेकॉर्डिंग करून देण्याचा व्यवसाय  होता. मी त्यांच्या कडे गेलो आणि
         गाणी रेकॉर्डिंग करून कॅसेट मध्ये भरून देण्याचे काम करू लागलो.
         दहावी पर्यंत हे काम केले. त्या नंतर पुढे मी विविध ठिकाणी विविध कामे
         केली. पण मनात विचार आला कलात्मक क्षेत्र निवडावे, म्हणून मी सातारा
         रोड वरील एका फोटो स्टुडिओत नोकरीला लागलो.
         मी त्या स्टुडिओत पडेल ती सर्व कामे अगदी साफसफाई सुद्धा करीत होतो.
         मालक फोटो काढतानाचे व व ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग करतानाचे निरीक्षण
         करायचो व त्या प्रमाणे शिकण्याचा प्रयत्न करीत असे. पिंपरी वरून सातारा
         रोड येथील स्टुडिओ पर्यंत येण्याजाण्या साठी बस भाडे १८० रुपये  महिना
         असे तो मी दारोदारी फिरून कॅसेट रेकॉर्डिंग करून जमवीत असे. मी विविध
         मासिके, पुस्तके यातुन फोटोग्राफीचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत असे.
         एकदा असेच एका समारंभात मालक आणि मी फोटो काढत असताना
         माझ्या चुकी मुळे मालकाने मला जोरात मारले व मी स्टेज वरून खाली
         पडलो, कुठे चुकले हे विचारून परत माझ्या कामाला लागलो.
         सतत ३ वर्ष मी या स्टुडिओत काम करीत होतो, मालकाने एक रुपयाही
         पगार दिला नव्हता पण मी त्यांना गुरु मानून त्यांच्या कडून मिळेल तेवढी
         कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांनी दिलेल्या कलेवरच
         आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे व तेव्हा मी ते काम सोडून दिले.
         काही दिवस मुंबईतही काम केले पण म्हणावं  तस यश मिळत नव्हते,

         माझे गुरु प.पु. देवाजी महाराज यांनी माझी पत्नी संगीता हिला सांगितले,
          ” सुशील को फोटोग्राफीमेही करियर करना चाहिए ! ” त्यांचा आशीर्वाद
         घेतला आणि परत पुणे गाठले व मनाशी ठरवले आता फक्त फोटोग्राफीचं
         करायची. पुढे मित्र,आईवडील यांच्या सहकार्याने माझा
         स्वतःचा पहिला ” PENTAX- ME SUPER ” हा कॅमेरा विकत घेतला.
         अनेकांना जाऊन भेटत असे, काम देण्याची विनंती करीत आहे.
         काही कामानिमित्ताने मी त्या वेळेसचे खासदार श्री. सुरेश कलमाडी व
         सौ. मीरा कलमाडी यांच्या संपर्कात आलो. सौ. मीरा कलमाडी यांनी मला
         खासदार श्री. सुरेश कलमाडी यांचे कार्यक्रम ” कव्हर ” करण्याची संधी दिली,
         त्यांच्या विश्वासास मी पात्र ठरलो. त्यांनी ” पुणे फेस्टिवल ” चे काम मला
        दिले आणि हा माझ्या आयुष्यातील ” टर्निंग पॉईंट ” ठरला. या निमित्ताने
        अनेक दिग्गज  कलाकार जसे अमिताभ बच्चन, हेमामालिनी, लता मंगेशकर,
        व अनेक नामवंत कलाकार तसेच राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा,
        ए.पी.जी. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी व पंतप्रधान श्री. पी.व्ही. नरसिहराव,
        इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग, तसेच केंद्रीय मंत्री मा. शरदजी पवार,
        सुशीलकुमारजी शिंदे, ते मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजजी चव्हाण अशा मातब्बरांचें
        अगदी जवळून म्हणजे तीन फुटाच्या आत फोटो घेण्याची संधी मिळाली.
        माझ्या ऑफबीट, हटके फोटोंना पत्रकारितेच्या क्षेत्रात न्याय  दिला तो
        दैनिक सकाळ मधील त्या वेळेसचे पराग करंदीकर
        यांनी. दैनिक सकाळ मध्ये माझ्या नावासह छायाचित्र प्रसिद्ध होऊ लागले.
        लाखो वाचकांना माझ्या फोटोतून आनंद मिळाले,
         मॉरिशियस च्या सांस्कृतिक मंत्री  शीला बापू  या माझ्या काढलेल्या
         फोटोंवर व बातमीवर बेहद खुश होऊन निरोप देताना म्हणाल्या होत्या
         ” Can I get A Person like You ” तर सुप्रसिध्द गायिका पिनाझ मसानी
         रात्री झालेल्या कार्यक्रमाचे  सुंदर फोटो पाहून म्हणाल्या
           ” I have never seen  A Person like You “. 
            संगीतकार कल्याणजी   आनंदजी यांचा कार्यक्रम
         रात्री बारा वाजता संपला व त्याच रात्री अडीच वाजता त्या कार्यक्रमाचे फोटो
         त्यांच्या हातात ठेवले आणि ते पाहून ते आश्चर्यचकित झाले ( कारण तो
         काळ कॅमेरा रोल चा होता,आता सारख्या सुविधा तेव्हा नव्हत्या) आणि
         त्यांनी रात्री अडीच वाजता ज्युसबार उघडायला लाऊन मला ज्युस पाजले.
         मी समजतो कि हीच माझ्या कामाची पावती व हीच कमावलेली माझी
         संपत्ती.
         अगदी निःस्वार्थ भावनेने, कुठलीही अपेक्षा न ठेवता पुण्यातील अनेक
         दैनिकांना छायाचित्र पुरविले.
         ” नेकी कर, दरिया में डाल ” या तत्वाने आयुष्य जगत आहे.
         या माझ्या संघर्षमय अंधारातील जीवनात ” प्रकाश ” आला तो ”
         “सकाळ  ” मुळेच.
          एवढ्यात लाईट्स आले, मी भानावर आलो, कॉम्पुटर सुरु केला आणि
          टिपलेल्या फोटोत ” जिवंतपणा ” आणण्याचे काम करू लागलो.
 
लेखक : सुशिल राठोड
पत्ता : १३९३/९५ शुक्रवार पेठ, विष्णुकृपा सोसायटी, पुणे – ४११००२
मोबाइल न. ९८२२२०८३३३
          
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...