पुणे-उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज कसबा मतदारसंघात भाजपचे राजेश येनपुरे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास तुडुंब प्रतिसाद मिळाला.यावेळी रक्तदान शिबीर देखील घेण्यात आले. भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या उपक्रमास भेट देऊन त्याबाबत कौतुक केले . असंख्य नागरिकांनी यावेळी इसीजी, नेत्र चिकित्सा ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया दंतचिकित्सा ,आदी आरोग्यविषयक सुविधांचा यावेळी लाभ घेतला .