नवी दिल्ली: बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधीकृत घोषणा केली .सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत.
रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमात झाल्याचं अमित शाह यांनी यावेळी सांगितले ..कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्ही सर्वपक्षीयांशी संपर्क साधून कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सोनिया गांधी यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही याबाबत सांगितल्याचं अमित शाह म्हणाले.मूळचे कानपूरचे असलेले कोविंद हे १९९४ ते २००६ दरम्यान राज्यसभेतील खासदार होते. याशिवाय ते भाजपच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या मोर्च्याचे अध्यक्षही होते. ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातील भाजपचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाते.

