नवी दिल्ली-,देशात द्वेष वाढवून हे सरकार भीती निर्माण करत आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भविष्याबद्दलची भीती वाढत चालली आहे. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचं विभाजन करू पाहतायेत. त्यांना देशात प्रेमाचं वातावरण नको आहे, त्यांना सतत भीती निर्माण करायची आहे ,गरीब अधिक गरीब करत श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याच्या धोरणाने देशात वाढत चाललेली दरी २ गटात रूप घेऊन एकमेकांविरोधात संघर्षाच्या पवित्र्यात सदैव राहील अशी स्थिती मोदी सरकार निर्माण करून ती कायम ठेऊ पाहत आहे. राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाचं महागाईविरोधात आज देशव्यापी हल्लाबोल आंदोलन पार पडलं. यावेळी रामलीला मैदानावर झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर शरसंधान साधलं. २०१४ ला गॅस, इंधन, आणि तेलाचे दर आणि सध्या २०२२ साली याच सगळ्याचे दर राहुल गांधींनी मंचावरुन वाचून दाखवले. देशाला आता काँग्रेसची गरज असल्याचं सांगत काँग्रेस पक्ष आता लोकांमध्ये जाईल, त्यासाठीच भारत जोडो यात्रा आयोजित करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
राहुल यांच्या भाषणातील मुद्दे
- मोदीजींनी नोटाबंदी केली. त्याचा गरिबांना फायदा झाला का? गरिबांच्या खिशातून पैसे काढले. गरिबांना सांगितले की काळ्या पैशाविरुद्ध लढा आहे. काही महिन्यांनी तुमच्या खिशातून लाखो कोटी रुपये काढल्याचे तुम्ही पाहिले.
- देशातील बड्या उद्योगपतींची कर्जे माफ झाली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही. शेतकऱ्यांवर काळे कायदे आणणार. हे कायदे त्यांच्या फायद्याचे आहेत असे म्हणतील. जर ते शेतकऱ्याच्या हिताचे असेल तर भारतात शेतकरी विरोधात का? नरेंद्र मोदीजींना शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवली. शेतकऱ्यांची ताकद मोदीजींना दिसताच त्यांनी कायदा रद्द केला.
- जीएसटीबाबतही तेच झाले. काँग्रेसला दुसरा जीएसटी आणायचा होता. भाजपने जीएसटी बदलला. पाच वेगवेगळे कर आणि लहान दुकानदारांना याचा फटका बसला.
- त्याचवेळी काँग्रेस मुख्यालयात निदर्शनासाठी जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अकबर रोडवरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या गाडीत बसून सर्व कार्यकर्ते वंदे मातरम आणि हल्लाबोलच्या घोषणा देत राहिले.
काँग्रेसमध्ये जाणे सोपे, टिकणे कठीण
या मेळाव्यात बोलताना काँग्रेस नेते आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन म्हणाले, आज महागाईची अशी स्थिती आहे की, बाजारात खरेदीला गेलात तर खिशातील सर्व पैसा संपतो, पण पिशवी शिल्लक राहते.”काँग्रेसमध्ये येणे खूप सोपे आहे, सोडणे सोपे आहे, पण त्यात टिकून राहणे फार कठीण आहे. लोक दोन पावले एकत्र चालतात, मार्ग बदलतात.”, असे म्हणत त्यांनी नुकतेच पक्ष सोडलेल्या गुलाम नबी आझाद यांचीही खिल्ली उडवली.
मोदी मित्रांमध्ये व्यस्त
निदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अकबर रोडपासून रामलीला मैदानापर्यंत नेले. पोलिसांच्या गाडीत बसून सर्व कार्यकर्ते वंदे मातरमच्या घोषणा देत राहिले. आंदोलनापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘राजा मित्रात व्यस्त आहे, जनता महागाईने त्रस्त आहे.’