भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य नृत्य यांचा मिलाफ पुणेकरांनि नुकताच अनुभवला २५-८-१८ ला सायंकाळी ७ वाजता ,कालाछाया कल्चरल सेंटर,सेनापती बापट रोड,येथे ही संगीत मैफल अतिशय दिमाखदार पार पडली .संपूर्णम प्रस्तुत टॅपडान्स आणि तबला यांचा मिलाफ ‘तबला टॅप ड्यूओ‘ नावानी सादरीकरण झाले तसेच‘‘बॉलीवूड टू ब्राॅड्वे’ या संकल्पनेने आगळी कलाकृती रसिकांच्या समोर आली तसेच उत्तरार्धात ‘बेस्ट ऑफ बॉलीवूड’मध्ये सायन टी. गुप्ता हे काही सिने-संगीतातील रचना आपल्या तडफदार आवाजात सादरकरून रसिकांना मंत्रमुग्ध केले .
या मैफलीत ‘तबला टॅप ड्यूओ‘ मध्ये निखील गोसावी टॅपडान्स आणि मोहनीश जाजू हे तबला सादर सादर केले त्यात देस ,किरवाणी या रागातील व मोबाईल धून ,कजरी,त्यात सवाल जबाब अशा विविध रचनांनी रसिकांची वाहवा मिळविली . त्यांना संतोष घनटे हार्मोनियमची तर मृगयेन्द्र मोहाडकर बासरी,निलांबू मुजुमदार हे बेस गिटारची साथ केली .तर ‘बेस्ट ऑफ बॉलीवूड’ मध्ये गायक सायन टी. गुप्ता यांचे गायन झाले त्यांनी सिने-संगीताची पेशकश केली .त्यात मुस्कुराने कि वजह ,गुलाबी आखें ,रोजा जानेमन ,तू हि रे ,ए जिंदगी गले लगा ले , जोहराजबी,तू जो मिला ,मोह मोह के धागे हि गाणी सादर केली.
त्यांना सायरा बॅडचे अरीन दुबे हे लीड गिटार व ज्योतीर्मोय हे रिदम गिटारची साथ ,मोहनीश जाजू ढोलक व काहून,मृगयेन्द्र मोहाडकर बासरी ,निलांबू मुजुमदार गिटार अशी साथ लाभली . मैफलीत भारतीय शास्त्रीय आणि सिनेसंगीत त्याचप्रमाणे पाश्चिमात्य संगीत या तिन्हीचे दर्शन वेगळ्या स्वरमय स्वरुपात रसिकांनी अनुभवले .ध्वनी व्यवस्था महेश शेवाडकर ,प्रकाश योजना ऋत्विक केळूचकर,प्रतिमा योजना कल्याणी मिरजगावकर आणि प्रसिद्धी सहयोजन तन्मयी मेहेंदळे यांची लाभली होती

