पुणे- संगीतकार नौशाद ते अलीकडच्या काळातील अजय -अतुल या संगीतकारांचा गाण्यांच्या मैफिलीने रसिकांनी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच डोक्यावर घेतले. जुन्या हिंदी गाण्यांपासून ते ‘सैराट’ सारख्या चित्रपटातील गीतांच्या यासांगितिक प्रवासाने पुणे नवरात्रौ महोत्सवात रंगत आणली.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सूर पालवी, पुणे प्रस्तुत वर्ल्ड ऑफ म्युझिशियन हा संगीतकार नौशाद ते अजय अतुल प्रवास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ नौशाद यांच्या ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्याने झाला. त्यानंतर ‘निगाहे निगाने को जी चाहता है…, तुम जो मिल गये हो…, इना मीना डिका…, पान खाये सय्या हमारो… ए मेरी जोहर जबी…दिवाना हुआ बादल…., मान के साथ तुम्हारा…, पिया पिया…, ये चाँदसा रोशण चेहरा …या संगीतकार नौशाद, मदनमोहन, सी.रामचंद्रन, शंकर जयकिशन, रवी, ओ.पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी रसिकांना जुन्या काळात नेले. या गाण्यांच्या तालावर ठेका धरत रसिकांनी भरभरून दाद दिली.
भप्पी लहरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, नदीम श्रवन आनंद मिलिंद, जतीन ललित , राम लक्ष्मण अशोक पत्की आणि अजय-अतुल यांच्या पर्यंतच्या दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली एकापेक्षा एक सरस गाण्यांनी रसिकांचे कान तृप्त केले.
अजय-अतुल यांच्या ‘लल्लाटी भंडार’, आणि सैराट मधील ‘झिंगाट’ गाण्याने तर प्रेक्षकांनी रंगमंच डोक्यावर घेतले.
या कार्यक्रमाच्या निर्मात्या व गायिका पल्लवी पत्की-ढोले, दिग्दर्शक संजय हिवराळे हे आहेत. गायिका पल्लवी पत्की-ढोले, मनीषा लताड, गायक संदीप चाबुकस्वार, रफी हबीब आणि अजय राव यांनी गाणी गायली तर निवेदन महेश चिंतलवार यांनी केले.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक माजी महापौर, नगरसेवक आबा बागुल, सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घन:श्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे , रमेश भंडारी, अमित बागुल आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे नवरात्रौ महोत्सवात रंगला सांगितिक प्रवास
Date:



