Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे महापौर करंडक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रशियासह दहा देश सहभागी,महापालिके तर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचेही आयोजन, 50 लाख रुपयांची भरघोस बक्षीसे

Date:

पुणे,  – पुणे महापौर करंडक आंतरराष्ट्रीय निमंत्रीत कुस्ती स्पर्धेत रशिया आणि इराण या प्रमुख देशांसह दहा देशांनी सहभाग निश्चीत केला आहे. या स्पर्धेच्या जोडीला आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. खराडीमध्ये 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील पदकविजेत्यांना सुमारे 50 लाख रुपयांची भरघोस बक्षीस देण्यात येतील. 80 परदेशी खेळाडूंसह यात सुमारे सहाशे खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे.

महापौर प्रशांत जगताप व प्रमुख समन्वयक हिंदकेसरी योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे चिटणीस बाळासाहेब लांडगे, माजी आमदार बापू पठारे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले उपस्थित होते.

स्पर्धा कै. राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या विठोबा मारुती पठारे स्टेडियमवर होईल. नगरसेवक महेंद्र पठारे यांचा संयोजन समितीत समावेश आहे.

जगताप यांनी सांगितले की, कुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि मल्लांना पाठिंबा मिळावा म्हणून भरघोस बक्षीसे देण्यात येतील. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी 14 लाख 47 हजार, तर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 33 लाख 52 हजार रक्कम आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठ वजनी गट आहेत. त्यातील सुवर्णपदक विजेत्यासाठी एक हजार डॉलर, रौप्यसाठी 700, तर दोन ब्राँझसाठी प्रत्येकी 500 डॉलर अशी रक्कम आहे.

तालीम संघाच्या माध्यमातून हिंदकेसरी योगेश दोडके स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतात. महापालिका या स्पर्धेची परंपरा कायम ठेवेल, असेही जगताप यांनी नमूद केले.

स्पर्धेविषयी माहिती देताना दोडके यांनी सांगितले की, महापालिकेतर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.  2012 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेने सुरवात झाली. त्यानंतर तीन वर्षे राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जोडीला राज्यस्तरीय स्पर्धा घेत आहोत. यात वयोगटांसह महिला विभागाचाही समावेश आहे. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रथमच मॅटवर होत आहे. महालापालिकेच्या सक्रीय पाठिंब्यामुळेच स्पर्धेची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा इनडोअर स्टेडीयममध्ये मॅटवर घेण्याचा नियम आहे. त्यानुसार आयोजनाची कल्पना मांडताच जगताप यांनी लगेच होकार दर्शविला. याबद्दल तालीम संघातर्फे मी त्यांचे आभार मानतो. 2012 मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इराणचा  सहभाग होता. यावेळी रशियाने निमंत्रण स्विकारले आहे. कझाकिस्तान, अझरबैजान, युक्रेन, तुर्कस्तान, जॉर्जिया, बल्गेरिया, उझबेकिस्तान, हंगेरी हे इतर सहभागी देश आहेत. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (यूडब्ल्यूड्ल्यू) या आंतरराष्ट्रीय  शिखर संघटनेने स्पर्धेला मान्यता दिली आहे, तसेच वार्षिक वेळापत्रकात स्पर्धेचा समावेश आहे. भारतीय कुस्ती महासंघ व राज्य कुस्तीगीर परिषद तांत्रिक संयोजन पाहतील.

या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यातील, राज्यातील तसेच देशातील खेळाडूंना अनुभव मिळावा म्हणून खास प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दहा स्पर्धकांसह  भारताचे तीन संघ, महाराष्ट्र तसेच पुणे शहरचा प्रत्येकी एक असे एकूण 15 स्पर्धक सहभागी होतील.

लांडगे यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे आपल्या मल्लांना बहुमोल अनुभव मिळेल तसेच आंतरराष्ट्रीय मल्लांच्या तुलनेत आपली क्षमता आजमावता येईल.

 साक्षीचा सत्कार

रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या साक्षी मलिकचा या स्पर्धेदरम्यान सत्कार करण्यात येईल. साक्षीला पाच लाख रुपये, मानपत्र प्रदान करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.

 मानपत्राची अनोखी संकल्पना

महापौर जगताप यांनी सांगितले की, साक्षीच्या पराक्रमामुळे महिला कुस्तीविषयी मोठी जागरुकता निर्माण झाली आहे. तिचे मानपत्र आगळेवेगळे ठरावे म्हणून एक अनोखी संकल्पना पुढे आली आहे. हाच धागा पकडून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठी मानपत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शंभर ते दीडशे शब्दांची मर्यादा असून सर्वोत्तम लेखनाची निवड करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्यात आळंदीची प्रतिभाशाली कुस्तीगीर अंकिता गुंड हिचा खास समावेश आहे. इतर सदस्य विविध क्षेत्रांतील मान्यवर असतील आणि त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील. या स्पर्धेचे परिपत्रक महापालिकेच्या शाळांना लपाठविण्यात आले आहे. 27 तारखेपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत आहे. समितीची बैठक 28 तारखेला होईल. त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. यशस्वी विद्यार्थिनीला साक्षीच्या हस्ते ऑटोग्राफ केलेला कॉश्च्यूम तसेच खास बक्षीस समारंभपूर्वक प्रदान केले जाईल. मानपत्राचा मजकूर मराठीत असेल व त्याचे हिंदीतील भाषांतर मागील बाजूस असेल.

 राज्यस्तरीय स्पर्धेचा तपशील

वरिष्ठ गट (8 वजनी गट) – 57 किलो, 61, 65, 70, 74, 86, 97, 86 ते 125 (खुला गट)

कॅडेट (17 वर्षांखालील-6 वजनी गट) – 42, 46, 50, 54, 58, 63.

कुमार (14 वर्षांखालील-7 वजनी गट) – 28, 30, 32, 35, 38, 42, 46.

किशोर (12 वर्षांखालील-7 वजनीगट) – 22, 25, 28, 30, 32, 35, 38.

महिला (8 वजनी गट) – 48, 53, 55, 58, 60, 63, 69, 75.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...