काँग्रेसच्या इच्छुकांसह 49 जणांनी नेले उमेदवारी अर्ज

Date:

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या इच्छुक असलेल्या तिघा उमेदवारांच्या वतीने चार अर्ज निवडणूक कार्यालयातून नेण्यात आले आहेत. तर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या वतीनेही उमेदवारी अर्ज नेला आहे. या मतदारसंघातून ४९ जणांनी अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. बारामती मतदारसंघातून ५४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले.
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज देण्यास गुरुवारपासून (दि.२८) सुरुवात झाली. पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा झालेले प्रवीण गायकवाड यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक शाखेकडे झाली आहे. तर, आणखी एक चचेर्तील उमेदवार अरविंद शिंदे यांच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे प्रक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र, मनसेच्या सुहास निम्हण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत ४९ उमेदवारांनी अथवा त्यांच्या वतीने ८० अर्ज नेण्यात आले आहेत. यातील २५ जणांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत.
बारामतील लोकसभा मतदारसंघात गेल्या ५४ जणांनी अर्ज घेतले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी शुक्रवारीच अर्ज नेले आहेत. शुक्रवारी सोळा जणांनी अर्ज नेले असून, त्यात ९ अपक्ष इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अजित पानसरे यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेला आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...