पुणे-स्त्री ही जगाला दिलेली निसर्गाची एक अनमोल देन आहे. आणि तिच्या
सौंदर्याचे विविध पैलू आणि गुण आपल्या परीने मांडल्या गेलेल्या आहे आणि या
सगळ्यांना गीत आणि नृत्याचा उत्कृष्ट अविष्कार देणार्या "जश्न-ए-हुस्न' या
कार्यक्रमाने रसिकांना मन मुराद आनंद दिला.
प्रख्यात कवी व दिग्दर्शक अमर वर्मा व ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या
कन्या गायिका राणी वर्मा यांचा "जश्न-ए-हुस्न' कार्यक्रम पुणे फेस्टिव्हल अंतर्गत
गणेश कला क्रीडा मंच येथे सादर करण्यात आला. त्यामध्ये हिंदी चित्रपट
गीतांमधून व्यक्त झालेल्या स्त्री सौंदर्याची महती, नृत्य गाणी या आधारे विषद
केली गेली.
‘चौधवीं का चाँद’ पासून सुरू झालेला प्रवास ‘चंदन सा बदन’;पिया ऐसो
जियामे’सजना है मुझे सजना के लिए’आणि ‘;इन आँखो की मस्ती के’; पर्यंत
गाणी आणि नृत्य ह्या आधारे जादू केली गेली तर ‘;चाँद आहें अरे गा’;चाँद सी
महबूबा हो मेरी’;, तसेच ‘;कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है’; या गाण्याच्या
प्रत्येक शब्दाचा अर्थ नृत्याच्या आधारे सादर करून स्त्री सौंदर्यची महती उलगडून
दाखवली गेली. तर ‘ऐ मेरी जोहरा जबी’तेरे चेहरे मे वो जादू है’;ये चाँद सा
रौशन चेहरा’; गाण्यांनी रसिकांनी ठेका धरला आणि ‘मधुबन मे राधिका नाचे रे’;
पर्यंत सुरू असलेल्या प्रवास शेवटी ‘;परदे मे रहने दो, परदा ना उठाओ’; या गाण्यावर
संपन्न झाला.
कार्यक्रमात पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष
कृष्णकुमार गोयल, रविंद्र दुर्वे, मोहन टिल्लू आदी उपस्थित होते. कृष्णकांत कुदळे
यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला. रसिक प्रक्षेकांनी कार्यक्रमास मोठी
गर्दी केली होती.