Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे .. पुन्हा सायकलींचे शहर?..

Date:

पुणे(शरद लोणकर )-‘स्मार्ट पुणे’ चे स्वप्न पाहता पाहता महापालिकेला  सायकलींचे शहर ही पुण्याची जुनी ओळख परत मिळवण्याची देखील आशा लागून आहे . अर्थात सायकलीने शहराचा वेग कमी होणार असला तरी .. पर्यावरणदायी  आणि आरोग्यदायी जीवन मात्र लाभू शकेल यात शंका नाही .शिवाय इंधन खर्च हि कमी होईल. आता शहरातील अनेकांना दुचाकी शिवाय नौकरी मिळत नाही.. आणि दुचाकी शिवाय पुण्यातील जीवनच दुर्लभ झाले आहे .सायकलींचा वापर  किती अंतरापर्यंत लोकं करू शकतील ? किती वेगाने .. म्हणजे वेळ कितपत आटोक्यात ठेवू शकतील ? असे प्रश्न असले तरी .. आजपर्यंत सकाळ सारख्या पुण्यातील माध्यमाने केलेले सायकल आणि बस वापराबाबतचे प्रयत्न ही सफल होवू शकलेले नाहीत . हे वास्तव असूनही पुणे पुन्हा सायकलींचे  शहर करण्याचे स्वप्न महापालिका पाहत आहे हा निर्धार ही कौतुकास्पद च  म्हणावा लागेल. सैराट ची आर्ची खेड्यापाड्यात बुलेट वरून धुमाकूळ घालीत असली , सई ताम्हनकरचे मोटार सायकल वरचे फोटो  एवढेच काय जॉनअब्राहम  पासून सर्वांचेच बाईक प्रेम उघड उघड स्पष्ट आहे . शिवाय बजाज .. होंडा आदी कंपन्यांकडून येणारा महसूल तो ही भाग आहेच .. या साऱ्या गोष्टी समोर असताना ‘सायकलींचे शहर’ या स्वप्नाची किमान कदर तरी करायलाच हवी .अगदी नक्कीच  .
पहा महापालिकेने नेमके काय आवाहन केले आहे
वाचा आणि ठरवा …

 

पुणे शहरास ‘सायकल फ्रेंडली शहर’ करण्यात आपले योगदान द्या !

पुणे ‘महानगरपालिका’ सायकल प्लॅन विकसित करत आहे.

यासाठी सर्व नागरिक, सायकल स्वार,आणि हौशी सायकल स्वार यांच्या सूचना उपयुक्त ठरतील. आपल्या मौलिक सूचना देण्यासाठी पुढील मुद्यांचा जरूर विचार करावा.

  • सायकलला पुन्हा एकदा लोकप्रिय वाहन करण्यासाठी काय करता येईल.
  • सायकलला लोकप्रिय पर्याय करण्यामध्ये, रहिवासी समूह, शैक्षणिक संस्था, कार्यालये यांची पुणे महानगरपालिकेसोबत भागीदारी कशी विकसित करता येईल.
  • पुणे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांना सायकल ट्रॅक पार्किग, कचरा कंटेनर आणि अतिक्रमणापासून मुक्त ठेवण्यामध्ये नागरिक कशा पद्धतीने सहकार्य करू शकतील.
  • नवीन सायकल ट्रॅक, लेन कुठे असावेत, केवळ सायकलसाठी ग्रीन-वे आणि सायकल पार्किंग कुठे असावी.
  • सायकलस्वारांना सध्या असुरक्षित वाटणारे रस्ते / चौक / ठिकाणे कळविणे जेणे करूण त्यांची पुन:रचना किंवा व्यवस्थापन बदलून त्यांना सुरक्षित करता येतील.

आपण आपल्या सूचना आमच्या संकेतस्थळास  https://punecycleplan.wordpress.com/online-inputs/ वर नोंदवू शकता.

र्इमेल : punecycleplan@gmail.com

पत्राद्वारे सुचना देण्यासाठी पत्ता :

पुणे सायकल प्लॅन

द्वारा वाहतूक विभाग, पुणे महानगरपालिका

तिसरा मजला, वीर सावरकर भवन, शिवाजी नगर, पुणे ४११००५

संकेतस्थळ https://punecycleplan.wordpress.com/

‘Like’ https://www.facebook.com/PuneCyclePlan2016

 

Help Make Pune a Cycle-friendly City!

Inputs are invited from cyclists, occasional cyclists as well as non-cyclists for the Pune Cycle Plan, being prepared by PMC this year.

Give your inputs, especially about

  • How to make cycling safe and convenient for existing cyclists as well as to attract two-wheeler and car users to shift to cycling
  • Location of cycle tracks, lanes, ‘cycle only’ greenways, public parking for cycles
  • Unsafe spots & crossings that may be improved by physical design or management
  • How to popularize cycling as a mode of transportation in Pune
  • How citizens can help PMC and Traffic Police in enforcement in keeping cycle tracks and cycle lanes free of parking, garbage and other encroachments
  • How residents’ associations, educational institutes, offices, public organizations can be a partner to PMC to improve facilities for cyclists and to popularize cycling

 

Submit your inputs online at https://punecycleplan.wordpress.com/online-inputs/

Email punecycleplan@gmail.com

Letters by post may be sent to

Pune Cycle Plan, Traffic Dept, Pune Municipal Corporation

3rd Floor, Veer SavarkarBhawan, Shivaji Nagar, Pune 411005

Pune Cycle Plan website https://punecycleplan.wordpress.com/

‘Like’ https://www.facebook.com/PuneCyclePlan2016

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...