महापालिका निवडणूक-काँग्रेसचा पुन्हा बहुखांबी नेतृत्वाचा तंबू .. (प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पहा-ऐका काय म्हणाले-व्हिडीओ)

Date:

पुणे- आगामी महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने पुन्हा
बहुखांबीनेतृत्वाचा तंबू उभारला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आणि विश्वजित कदम हे तिघे या तंबूचे प्रमुख पदाधिकारी असणार आहेत . याशिवाय अन्य पदाधिकारी देखील या तंबूची धुरा सांभाळणार आहेत. हे आज पुण्यात अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झाले आहे .

बॅरीस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या नंतर सुरेश कलमाडी यांच्याकडे पुण्याच्या नेतृत्वाची धुरा होती.तोपर्यंत कॉंग्रेसचे शहरात प्राबल्य होते. कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसकडे एकखांबी असे कणखर नेतृत्व उरले नाही . त्यानंतर कॉंग्रेसने सामुहिक नेतृत्वाची कल्पना अंमलात आणली . आणि शहरातील कॉंग्रेसचे प्राबल्य हळू हळू कमी होत गेले . या निवडणुकीतही कॉंग्रेसकडे कणखर असे एक स्थानिक नेतृत्व उरले नसल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे …. आज काँग्रेस ने आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक घेतली . यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण , रत्नाकर महाजन, शहर अध्यक्ष रमेश बागवे , विश्वजित कदम , अभय छाजेड ,अविनाश बागवे, शरद रणपिसे, आदी मान्यवर नेते उपस्थित होते .

यावेळी पत्रकार परिषदेत …पहा आणि ऐका .. नेमके कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण काय म्हणाले ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...