मुंबई – मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यानअडकलेली होती त्यात तब्बल 1200 प्रवासी प्रवास करत होते मात्र महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे व वांगणी येथील ग्रामस्थांचे राज्याचे महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील आभार व्यक्त केले आहे.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये 1200 प्रवासी अडकल्याची माहिती संपूर्ण यंत्रणांना तत्काळ घटनास्थळी पोहचण्याचे आदेश महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या सर्व 1200 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून त्यासाठी राज्याचे डिझास्टर मॅनेजमेंट ची टीम एनडीआरएफ, नेव्ही, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी युद्धपातळीवर कार्य केले. नौसेना आणि एनडीआरएफ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क करताच या यंत्रणांनी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावली. नेव्हीचे पाणबुडे अशी संपूर्ण यंत्रणा बचावकार्यात लागली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत संपूर्ण संपूर्ण यंत्रणांना तत्काळ बचावकार्य करण्याचे आदेश दिले होते एनडीआरएफच्या सहा बोटी सकाळी नऊ वाजता पासून बचाव कार्यात लागल्या होत्या. त्यांच्यासह स्थानिक पोलिस प्रशासन कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, हे सुध्दा बचावकार्यात घटनास्थळी हजर होते . त्यानंतर नेवी व एअर फॉर्स ला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. एअरफॉर्स दलातील हेलिकॉप्टरने नऊ जणांना ठाणे येथे सुरक्षित स्थळी पोचविण्यात आले. सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सात लोकांना बाहेर काढण्यात आले त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी 117 लोकांना बाहेर काढण्यात आले. दुपारी एक च्या दरम्यान पाचशे लोकांची सुटका यामधून करण्यात आली. या रेल्वे मध्ये 1200 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी नऊ या गर्भवती महिला होत्या त्यांनाही वेळेत उपचार देऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले याठिकाणी 37 डॉक्टरांची चमू ही उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच ॲम्बुलन्स औषध उपचार याचीही ही सेवाही उपलब्ध करून देण्यात आली होती. 40 बसेस आणि टेम्पो याच्या साह्याने बदलापूर येथे प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात येत होते अशी माहिती देत श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त केले आहेत.


