नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देऊन दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य चिंतले आहे. वाढदिवसाच्या राष्ट्रपतींना शुभेच्छा. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बुद्धीमत्तेमुळे राष्ट्राचा मोठा लाभ झाला आहे. त्यांच्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो.
प्रणवदा यांनी सदैव, देशाचे हित सर्वोच्च स्थानावर ठेवले आहे. असे बुद्धीमान राष्ट्रपती लाभल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Date: