दिवसातून 16 ते 18 तास काम करणारा नेता प्रशांत जगताप

Date:

लेखक :शांतीलाल सुरतवाला,माजी महापौर पुणे

पुण्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. पक्ष नवीन होता, नवीन माणसं शोधायची होती काम करणाऱ्या तरुणांना जवळ करायचं होतं. नवीन सभासद नोंदणीचे काम सुरू केल्यावर लक्षात आलं सर्वात जास्त सभासद नोंदणी प्रशांत जगताप यांनी केली. जवळ-जवळ 1800 सभासद प्रशांत जगताप यांनी नोंदवले होते. ज्यांनी सभासद नोंदणी मध्ये काम केला आहे त्यालाच 1800 सभासद नोंदणी करणे किती जिकिरीचे आहे ते कळते. ज्या वयात लोक वॉर्डात काम करतात त्या वयात ना. अजित दादांशी बोलून प्रशांत जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्याच्या चिटणीस पदी निवड केली.

. माझ्या कार्यकाळात कार्यरत तरुण पुढे महानगरपालिकेतील दिसला. नगरसेवक म्हणून पुण्याच्या नजरेत भरला आणि बोलता बोलता साहेब आणि अजित दादा यांचे मन जिंकून महापौर झालेला पहिला मिळाला. राजकारणात पाठीवर थाप टाकणारे कमी असतात व शिंतोडे उडवणारे अधिक असतात. प्रशांत जगताप यांनी त्यांच्या विरोधकांना सुद्धा शिंतोडे उडवण्याची संधी दिली नाही. आज राजकारणात शुभ्र नेत्यांची आवश्यकता आहे. हीच वेळ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी साथ देण्याची .मोठ्या लोकांचे फोन यायला लागली की छोट्या लोकांचे फोन स्वीकारत नाही. प्रशांत जगताप यांना अपवाद आहे. माझा फोन घेतला नाही असे सांगणारा एकही तळागाळातला कार्यकर्ता सापडणार नाही. व्यसन नसल्यामुळे ताकदीने दिवसातून 16 ते 18 तास काम करणारा नेता आहे हे माझे निरीक्षण.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...