नवी दिल्ली. केंद्र सरकारने आज(शनिवार) कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘वाईट वेळ निघून केली आहे, पण जोपर्यंत व्हायरस संपुर्ण नष्ट होत नाही, तोपर्यंत नियमांचे पालन करावे लागेल. हे संक्रमण चीनमधून आले आहे, पण अद्याप याचे औषध मिळाले नाही. औषध मिळेपर्यंत आपल्याला व्हायरससोबतच जगावे लागेल. मास्क लावणे, सतत हात धुणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हे सर्वांसाठी गरजेचे आहे.’
जावडेकर पुढे म्हणाले की, लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत मिळाली आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात 4 मे पासून अर्ध्या देशातील कामकाज पुर्ववत होईल. कोरोनावर आमचे व्यवस्थापन इतर देशांपेक्षा खूप चांगले आहे. सर्व परिसरांना झोनमध्ये विभागले असल्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे.
विरोधकांच्या आरोपांवर जावडेकर म्हमाले की, ‘विरोधक दिशाहीन आहेत. त्यांच्याकडे बोलण्यास कोणताच मुद्दा उरलेला नाही. सध्या ते चांगली चर्चाही करत नाहीयेत आणि सल्लादेखील देत नाहीयेत. ते आधी ज्या मुद्द्यांवर सहमती दर्शवत होते, आता त्यांवरच आरोप करत आहेत.’ पश्चिम बंगाल सरकारच्या आरोपांवर जावडेकर म्हणाले की, तिथे काही लोकांना भारत आणि बंगालदरम्यान युद्ध करण्याचे ठरवले आहे. पण, आम्हाला यात काहीच रस नाही. आम्हाला त्या राज्याची मदत करायची आहे, तेथील समस्या दूर करायची आहे.