‘गोळ्या घालून शांतता निर्माण होणार नाही’:असगर वजाहत

Date:

‘कला आणि साहित्यात समाजाचे योगदान’ व्याख्यानाला चांगला प्रतिसाद 
पुणे :
‘मानवाला, समाजाला,संपूर्ण जगाला आज शांततेची गरज असून शांततेच्या माध्यमातूनच ती निर्माण होईल,गोळ्या घालून शांतता निर्माण होणार नाही’,असे प्रतिपादन संगीत नाटक अकादमी विजेते ज्येष्ठ हिंदी नाटककार असगर वजाहत यांनी रविवारी केले.
सम्यक उपासक संघ,नालंदा बुद्ध विहार यांनी संयुक्तपणे आयोजित रविवारी सकाळी असगर वजाहत यांचे ‘कला,और साहित्य मे समाज का योगदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.या व्याख्यानादरम्यान असगर वजाहत यांनी सद्य स्थितीवर भाष्य केले.या  व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम नालंदा बुद्ध विहार(मॉडेल कॉलनी) येथे झाला.
ते म्हणाले,’मानवाला,समाजाला आणि जगालाही शांततेची आवश्यकता आहे.पण,शांततेसाठी शक्तीची गरज नाही.शांततेच्या माध्यमातूनच शांतता निर्माण होईल. जे लोक विरोधात आहेत,त्यांना गोळ्या घालून शांतता निर्माण होणार नाही. तसेच,शांततेच्या विरोधातील लोकांनाही गोळ्या मारून शांतता निर्माण होणार नाही. युरोप आणि इतरत्र अनेक देश संपन्न झाले आहेत,गुन्हेगारीमुक्त झाले आहेत. पण, त्यांना असमानतेचा शाप आहे. असमानतेमुळे गती आणि चेतना कमी पडते.म्हणून समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळेही शांतता प्रस्थापित होईल.
‘आपण प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्नाने उत्तर मिळते आणि मानव विकासाची प्रक्रिया विकसित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या शांततेच्या मार्गाचा अवलंब केला आणि शस्त्रापेक्षा शास्त्राला महत्व दिले’, असेही असगर वजाहत यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले,’मेट्रो सारख्या भौतिक विकासाच्या गोष्टींकडे आपण लक्ष देत असलो तरी शिक्षणाच्या तरतुदीकडे लक्ष द्यावे लागेल. बौद्धिक परिवर्तन होणे महत्वाचे आहे,अन्यथा विकसित साधनांचा उपयोग होणार नाही.
‘साहित्य,कला,संगीत,काव्य,नाटक,कथाकथन,ग्रंथ लेखन ही सर्व विचाराला संवादाच्या माध्यमातून नेणारी प्रभावी माध्यमे आहेत. प्रेम आणि घृणा निर्माण करण्यासाठी ती वापरता येतात. पण,आपण मध्यम मार्ग शोधला पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे. भाषा वेगळ्या असतील पण मनुष्याचा मनुष्याशी संवाद होऊ शकतो. सर्व भावना,त्याग,प्रेम यांचा एकमेकांशी  संवाद साधला जाऊ शकतो.  हा सर्व संवाद कला आणि साहित्याच्या माध्यमातून होवू शकतो. मोठमोठ्या गोष्टी छोट्या शब्दातून मांडता येतात,हेच कला आणि साहित्याचे सामर्थ्य आहे’,याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘डॉ बाबासाहेब आंबेडकर :महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत डॉ आंबेडकर यांचे मोठे बंधू बाळ दादा यांची भूमिका करणारा युवा कलाकार आदित्य बीडकर याचा सत्कार या कार्यक्रमात भारतीय संविधान, बुध्द आणि धम्मग्रथ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्रमय गौरव ग्रंथ ,शाल,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. प्रा.रतनलाल सोनाग्रा आदित्य बीडकर   यांनी मनोगत व्यक्त केले, मिलिंद वाकोडे, देवानंद मेश्राम, चोरडिया, संध्या म्हस्के, पंचशिला  दुर्गे, उज्वला मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते, प्रास्ताविक संजय मोरे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गुजरातमध्ये पूरस्थिती; १९ जणांची सुटका, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर

अहमदाबाद / मुंबई | प्रतिनिधी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार...

केके आय इन्स्टिट्यूटचा प्रगत ग्लॉकोमा शस्त्रक्रियांसाठी परिसंवाद संपन्न

पुणे,  पुण्यातील कोरेगाव पार्क येथील केके आय इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच...

खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठ्यात एका दिवसात 0.48 TMC ची वाढ; आवक 480 Mcft वर

पुणे | पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत शनिवारी...

बेकायदा बांधकाम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – माजी उपमहापौरांची पोलिसात तक्रार

संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नाही महापालिकेच्या कामबंदीची नोटीसीला केराची...