नागरिकत्व नोंदणी द्वारे समाज विभाजित करण्याचा, भय ग्रस्त करण्याचा सरकारकडून प्रयत्न: तीस्ता सेटलवाड

Date:

जनजागृतीतून नागरिकत्व नोंदणीला विरोध करा: तीस्ता सेटलवाड

पुणे:ए. के. के. न्यू लॉ एकेडमी च्या वतीने ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी'(नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप) विषयावर तीस्ता सेटलवाड यांच्या उपस्थितीत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) च्या असेंब्ली हॉल मध्ये शनिवारी, ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३०वाजता झाला.

या चर्चासत्रात तीस्ता सेटलवाड यांचे प्रमुख भाषण झाले. अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. व्यासपिठावर संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, मुजफ्फर शेख,ए. के. के. न्यू लॉ एकेडमीचे प्राचार्य डॉ. रशीद शेख, आय. पी. इनामदार होते.

तीस्ता सेटलवाड म्हणाल्या, “विना चौकशी, बेकायदेशररित्या ताब्यात घेण्याचा हक्क ‘ राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ‘या कायद्याने सरकारला प्राप्त होत आहे. विधेयक संमत होऊन अंमलबजावणी सुरू आहे. ब्रिटीश काळात या गोष्टी होत होत्या. आसाम मध्ये घुसखोर हा शब्द ऐकून तेथील लोक विटले आहेत. तेथे 13 डीटेशन कॅम्प उभारण्यात आले आहेत. तेथे महिलांना राहण्याची काय अवस्था आहे, हे जाणून घ्या.

आपला राष्ट्रवाद हा या मातीतील राष्ट्रवाद आहे. त्याला सर्व समाजानी एकत्र येवुन केलेला स्वातंत्र्य लढा कारणीभूत आहे.1955 चा नागरिकत्व कायदा बदलला जात आहे. नागरिकता हा मूलभूत अधिकार आहे. हा सर्व प्रकारचे अधिकार देणारा अधिकार आहे.

तीस्ता सेटलवाड म्हणाल्या,”आताची सरकारची पावले आपल्याला घबरविण्याची आहेत. आपण एकत्र राहून , धैर्याने , लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे. आसाम मध्ये 2017 नंतर 1 कोटी,40 लाख,22 लाख लोक रजिस्टर बाहेर काढण्यात आले. आपले नागरिकत्व काही कागद ठरवणार आहेत का ? माजी राष्ट्रपती फकृद्दिन अली अहमद यांचे कुटुंबीय, एक विधानसभा अध्यक्ष यांचे कुटुंब, कारगिल युध्दातील सैनिक रजिस्टर च्या बाहेर कसे काय ठेवण्यात आले ? नागरिकत्व सिद्ध करण्याच्या फंदात लोकांनी लाखो खर्च केले, जमिनी विकल्या, आत्महत्या केल्या. हे भयावह आहे.

हा घाबरविण्याचा, विभाजित करण्याचा कट आहे. नोंदणीचा त्रास फक्त मुस्लीम समाजालाच होईल, हा भ्रम आहे. साधारण 48 टक्के जनतेकडे जन्म नोंदणी विषयक कागदपत्रे नाहीत. श्रमिक, बहुजन , गरीब, भूमीहीन, आदिवासी यातून भरडले जाणार आहे. त्या सर्वांना कोठे पाठवणार आहे हे सरकार ? असा सवालही त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या,’ मानेवर सतत टांगती तलवार ठेवली की आर्थिक, सामाजिक, राजकीय अधिकारांकडे पाहणे विसरले जावे, हा हेतू आहे. शिक्षण, रोजगार यावर सरकार का बोलत नाही ?

“कोणते कागद नसले तर डिटेंशन कॅम्प मध्ये ठेवले जाणार, आणि कोणते कागद असले तर सोडले जाणार यात स्पष्टता नाही. संसद, समाजामध्ये चर्चा झाल्याशिवाय ही नागरिकत्व नोंदणी सुरू करू नये”, असेही सेटलवाड यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा...

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघडमुंबई...

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:’क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार-महापौर मंजुषा नागपुरे

पुणे -शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल...

स्त्री जन्माचा दर कमी होतोय .. याची गंभीर दखल घेणार कधी ?आमदार जितेंद्र आव्हाड

स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी करणरे डॉक्टर,...