पुणे :
कात्रज : कात्रज- कोंढवा रोड येथील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेच्या जमुना नालकोल हिने प्रथम क्रमांक आणि समृद्धी नाईक हिने दुसरा क्रमांक मिळवला. तसेच विज्ञान शाखेच्या संदेश आगलावे याने प्रथम क्रमांक मिळवला. तर जुईली गायकवाड हिने दुसरे स्थान निश्चित केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी, प्राचार्य सौ. जयश्री जाधव आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.