पुणे :शिवांजली डान्स अकॅडमीचा 10 वा वर्धापनदिन जेष्ठ अभिनेत्री सौ. दीपा श्रीराम लागू आणि सीड इन्फोटेकच्या संचालिका सौ. भारती बर्हाटे यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिर येथे 10 मार्च 2019 रोजी साजरा करण्यात आला.
अनुजा बाठे यांच्या नृत्य दिग्दर्शित ” हरी -हर” ही संकल्पना 30 विद्यार्थ्यानी सादर केली.’हरी’ हा पालनकर्ता तर ‘हर’ हा संहारकर्ता अश्या विरोधाभासी रचना प्रस्तुत करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या वेळी सौ. दीपा लागू यांचे नृत्यामध्ये करियर यावरील संवाद आणि भारती बर्हाटेचे म्युझिक थेरपी वरचे संवाद विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरले.

पूर्वार्धात अभंग तर उत्तरार्धात अडू पामबे या रचनांना प्रेक्षकांची उस्फूर्त दाद मिळाली.
या वर्षीचा’ स्टुडंट ऑफ द इयर’ चा पुरस्कार दर्शना पासकंठी आणि शुभवि जोशी हिला देण्यात आला.शिवांजली डान्स अकॅडमीचे विश्वस्त श्री. सुहास बाठे, सौ. मीनल बाठे,सचिव अभिजीत बाठे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी यांनी केले.