मीनल कुलकर्णी या सृजन नृत्यालयाच्या संस्थपाक- अध्यक्ष आहेत. त्यांनी गुरु स्वाती दैठणकर यांच्या कडून शिक्षण घेऊन ‘भरतनाट्यम अलंकार’ पदवी प्राप्त केली आहे.
![नृत्यनाट्य अविष्कार कार्यक्रमात उलगडणार ज्ञानदेवांचे अभंग आणि जीवनपट](https://mymarathi.net/wp-content/uploads/2018/10/IMG-20181009-WA0025.jpg)
नृत्यनाट्य अविष्कार कार्यक्रमात उलगडणार ज्ञानदेवांचे अभंग आणि जीवनपट
पुणे :
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फो सिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प् रसार कार्यक्रमांतर्गत ‘नाचू अभंगाचे रंगी’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगाचा नृत्यनाट्य अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ५७ वा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
‘कलापिनी’ (तळेगाव दाभाडे) निर्मित आणि ‘सृजन नृत्यालय’ प्रस्तुत हा कार्यक्रम ‘भारतीय विद्या भवन‘ चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.
कार्यक्रमाची संकल्पना लेखन, दिग्दर्शन आणि नृत्यरचना मीनल कुलकर्णी यांचे आहे. संगीत दिग्दर्शन विनायक लिमये यांनी केले असून, नेपथ्य आणि प्रकाशयोजना केदार अभ्यंकर यांची आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
१९९५ मध्ये ‘सृजन नृत्यालय भरतनाट्यम डान्स अकॅडमी’ ची सुरुवात झाली. २० वर्ष ही संस्था भारतीय नृत्याचे शिक्षण देत आहे.
हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांच्या जीवनावर आधारित न्रूत्यनाट्य आहे. ज्ञानदेवांच्या अभंगावरील न्रूत्यरचना व त्याबरोबरच त्यांचा जीवनपट उलगडणारे नाट्यपूर्ण प्रसंग या नृत्यनाट्याद्वारे सादर करण्यात येणार आहेत, असे मीनल कुलकर्णी यांनी सांगितले.