पुणे :सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना विविध प्रश्नात मार्गदर्शन करण्याचे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे काम महत्वपूर्ण आहे, त्यामुळे जीएसटी पासून केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन खा. वंदना चव्हाण यांनी केले.
सोमवारी सकाळी खा. चव्हाण यांनी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाच्या नारायण पेठ येथील कार्यालयाला भेट दिली आणि गृहनिर्माण सहकारी संस्था चे केंद्र सरकारशी प्रश्न समजावून घेतले. आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचे प्रशिक्षण, जनजागृती, पर्यावरण रक्षण यासाठी एकत्रित प्रयत्नांबाबत यावेळी चर्चा झाली. तसेच गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांसंदर्भात राष्ट्रीय चर्चासत्र ऑक्टोबरमध्ये घेण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी जमा केलेल्या देखभाल खर्चावर जीएसटीमध्ये सवलत मिळावी, या साठी दिल्लीत प्रयत्न करू, असे खा. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मनिषा कोष्टी, गृहनिर्माण महासंघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

