पुणे : ‘युनिक इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट’ (कात्रज -कोंढवा रस्ता, गोकुळनगर ) यांना ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन’ (बंगळुरु ) ने ‘नॅक अॅक्रिडिटेशन’ दिले आहे. हे अॅक्रिडिटेशन ५ वर्षांकरिता आहे. ‘ नॅक समितीने ३०, ३१ जुलै रोजी संस्थेला भेट देऊन पाहणी, तपासणी केली होती.
या मूल्यांकनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी यांनी संचालक डॉ. शरद इनामदार, प्राध्यापक वर्ग कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

