‘आयएमईडी’च्या ‘इंडस्ट्री-इन्
पुणे :” कार्पोरेट जगत आणि मॅनेजमेंट महाविद्यालये यांच्यात सातत्यपूर्ण संवादाची गरज असून एकमेकांच्या गरजांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा ‘असे प्रतिपादन भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ . माणिकराव साळुंखे यांनी केले .
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या’इन्स्टिट्यू ट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट'(आयएमईडी)तर्फे शनिवार, 25 ऑगस्ट 2018 रोजी ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट- 2018’ चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी उदघाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते .
डॉ . साळुंखे म्हणाले ,’कार्पोरेट जगत आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशिक्षण महाविद्यालये यांच्या एकमेकांकडून विविध अपेक्षा असतात ,त्याचा अभ्यास व्हायला हवा . भारती विद्यापीठ दूरदृष्टी ठेवून ,भविष्याची गरज ओळखून विद्यार्थ्यांची जडण घडण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे . व्यवस्थापन शास्त्र व इंडस्ट्रीमधील संवादाची दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करू . त्यासाठी स्व . पतंगराव कदम यांची या संदर्भातील धोरणे दिशादर्शक ठरतील .
यावेळी बोलताना अंकित भटनागर म्हणाले ,’ कार्पोरेट जगत आणि व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थी यामध्ये संवाद प्रक्रियेबद्दल आय एम इ डी चा पुढाकार महत्वपूर्ण आहे . कार्पोरेट जगतात गांभीर्याने काम करणारे आणि मूल्यव्यवस्था मानणारे विद्यार्थी यावेत अशी अपेक्षा असते . काम सुरु केल्यावर त्यांच्या प्रशिक्षणावर जास्त वेळ घालवावा लागू नये ,अशी कार्पोरेट जगाची अपेक्षा असते . विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात काम करावे ,त्यांच्याकडे तसे संवाद कौशल्य असावे ‘
यावेळी आल्हाद थत्ते (उपाध्यक्ष, ‘क्लाउस मल्टिपार्किंग लि.’), आय एम इ डी चे संचालक डॉ . सचिन वेर्णेकर ,डॉ अँथनी रोझ ,डॉ . अजित मोरे व्यासपीठावर उपस्थित होते
आयएमईडीच्या ‘अभिजीतदादा कदम ऑडिटोरियम’, एरंडवणे येथे अंकीत भटनागर (सह संस्थापक, ‘पायसो फिनटेक’) यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन झाले . कॉर्पोरेट जगतातील ३० हून अधिक मान्यवर तसेच व्यवस्थापन शास्त्र विषयाचे ६०० हून अधिक विद्यार्थी या समिट मध्ये सहभागी झाले .
‘व्यवस्थापन विद्यार्थ्यांची उद्योगासंबंधित अपेक्षा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले . आयएमईडीच्या ‘प्लेसमेंट ब्रोशर’चे प्रकाशन या झाले . उद्योग, व्यवस्थापन शास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर गटचर्चा, खुली चर्चा देखील आयोजित करण्यात आली . आय एम इ डी चे संचालक डॉ . सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले .

